Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरश्री गोगादेवजी, राष्ट्रीय संत नवलस्वामीजी व वीर रतनसिंगजी महाराज यांचा जन्मउत्सव ...

श्री गोगादेवजी, राष्ट्रीय संत नवलस्वामीजी व वीर रतनसिंगजी महाराज यांचा जन्मउत्सव विविध उपक्रमांनी हर्ष उल्हासाने साजरा..भव्य मिरवणुकीने लक्ष वेधले..

जळगांव – दि.१८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
श्री गोगादेवजी,राष्ट्रीय संत नवलस्वामीजी व वीर रतनसिंगजी महाराज यांचा जन्मउत्सव शहरात विविध धार्मिक उपक्रमांनी हर्ष उल्हासाने साजरा करण्यात आला.पूजा अर्चना,भजन,भव्य मिरवणूक,प्रसाद वितरण असे विविध उपक्रम राबवण्यात आले.सालाबादप्रमाणे मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री गोगादेवजी,राष्ट्रीय संत श्री.नवलस्वामिजी महाराज व विर रतनसिंगजी महाराज यांचा जन्म उत्सव दि.१७ रविवार रोजी हर्ष उल्हासाने साजरा करण्यात आला.सर्वप्रथम गुरुनानक नगर परिसरात लोकप्रिय आमदार श्री राजुमामा भोळे,शनिपेठ पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर मॅडम,माजी नगराध्यक्ष दलित नेते श्री भैय्यासाहेब शिवचरण ढंढोरे यांच्या शुभहस्ते पुजा अर्चना करून निशान(छडी)पालखी मिरवणुकीची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.

विविध आरास साकारून मिरवणुकीने चित्त वेधले..

ठरलेल्या मार्गावरून विविध आरास सजावट असलेली ही मिरवणूक ढोल ताश्याच्या गजरात,युवा वर्गाने
डी.जे.च्या तालावर ठेका धरत गाजतवाजत श्री नवल धाम गोगादेवजी रतनसिंगजी मेढी बाबा रामदेवजी मंदिर येथे आली.या वेळी संपूर्ण मंदिराच्या परिसरात विद्युत रोषणाईने चैतन्यमय वातातावरन निर्माण झाले होते.

ना.गिरीश महाजन यांची कार्यक्रम स्थकी भेट

सर्वप्रथम राष्ट्रीय संत नवलस्वामीजी,गोगोदेवजी,श्री रामदेवजी बाबा व वीर रतनसिंगजी महाराज यांच्या मूर्तीस प्रमुख अतिथि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते पुष्पमाला अर्पण करून महाआरती करण्यात आली तसेच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी श्री गोगादेवजी महाराजांच्या पवित्र कार्यातून प्रेरणा घेवून वाटचाल साधण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित समाज बांधवांना केले.व नंतर सर्व उपस्थित भाविक भक्त जनांना प्रसादरूपी फराळाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.ह्या धार्मिक कार्यक्रमाचे प्रमुख मेहतर समाजाचे सरपंच संदीपभैय्या ढंढोरे,व नवलधाम गोगा मेढीचे अध्यक्ष आशीतोष ढंढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातवरणात संपन्न झाला.यावेळी मिरवणुकीच्या प्रारंभी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री मा.श्री गिरिषभाऊ महाजन,लोकप्रिय आमदार श्री राजुमामा भोळे,शनिपेठ पोलिस स्टेशन पी.आय.कावेरी कमलाकर मॅडम,राष्ट्रवादी कांग्रेसच्या (अजितदादागट) सौ.प्रतिभाताई शिंदे,माजी नगरसेवक कैलास सोनवणे,गुरुनानक मंदिराचे सेवेकरी छत्रूजी ढंडोरे,शिवसेना उबाठा जिल्हा शहर अध्यक्ष शरद तायडे,भाजप जिल्हा शहर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी,नगरसेवक मुकुंद सोनवणे,महा जनक्रांती मोर्चा अध्यक्ष मुकुंद सपकाळे,ब्री.जमदार आत्मचरण ढंडोरे,समाजसेवक रमेश घुसर,माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे,माजी उपमहापौर सुनील खडके,इदगाह ट्रस्ट अध्यक्ष वहाब मलिक,समाजसेवक जयप्रकाश चांगरे,माजी नगरसेवकः खालिद बागवान,आर.पी.आय शहर अध्यक्ष अनिल अडकमोल,दीपकभगत ढंडोरे,लखन भगत तंबोली ,आकाश भगत सोनवाल,दीपक भगत गोयर,विशाल-भगत लोट,नवलधामचे पंडित पुरुषोत्तम कंडारे (बंटी) ,बाबू उस्ताद धवलपुरे,खालिद एलेकार,बन्सी डाबोरे ,सुनिल ढंढोरे,नरेश ढंढोरे,मनोज ढंढोरे,सुभाष बेंडवाल ,सुरेश सोनवाल,मंगल अटवाल,सुरेश जावळे,संजय गोयर,ईश्वर पवार,कांती चांगरे, कय्युम शेख, हुकमीचंद चावरीया,महेश शिंदे,विलास मेघे,सुभाष सपकाळे,नाना सपकाळे,ई.मान्यवर उपस्थित होते.

याकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक श्री संदीपभैय्या ढंढोरे,विलास लोट,रोहित बेंडवाल,हर्षल ढंढोरे,भोपू अटवाल,रमेश कंडारे,मनोज जयराज,शंकर अंभोरे,पप्पू पवार निखिल बेंडवाल,नीलेश ढंढोरे,जयंत ढंढोरे, अनिकेत बेंडवाल,राज ढंडोरे,उमेश गोयर,चेतन ढंढोरे,रोहित ढंढोरे,ओम ढंडोरे,वंश ढंडोरे,सुधीर सोनवाल,सुरेश दिवेकर,छोटु करोसीया,दिलीप सोनवाल,अजय ढंढोरे,चंद्रविर ढंढोरे,ध्रुव लोट,पुष्कर ढंडोरे,राजविर ढंढोरे ई.परिश्रम घेतले.या कार्यक्रमामध्ये सर्व समाज बांधव,भगिनी व बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या