Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरबळीराम पेठेत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.

बळीराम पेठेत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.

जळगांव – दि.२९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) दरवर्षी प्रमाणे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज विजयग्रंथाचे सामुहिक पारायण बळीराम पेठेत  ब्राह्मण सभा येथे आयोजित करण्यात आले होते.या धार्मिक उपक्रमची सुरुवात  बळीराम पेठेतील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रेरणा स्थान स्व.नरेंद्र भाऊ चंदनकर यांनी त्या काळात केली होती ती परंपरा आजही या नवीन पिढीच्या माध्यमातून  चालू आहे.दिनांक २६.मंगळवार ते २८ ऑगस्ट,गुरुवार या कालावधीत सकाळी ६ वाजता पारायणला सुरुवात झाली तसेच ऋषिपंचमीच्या दिवशी म्हणजे दि.२८ ऑगस्ट,गुरुवारी सकाळी ९.३० मी.आरती व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं परिवारासह या धार्मिक उपक्रमात सहभाग घेतला.ब्राह्मणसभा,बळीराम,पेठ,जळगाव येथे पारायण: दि.२६ ते २८ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ६ वा. प्रारंभ झाला. महाप्रसाद कार्यक्रम दि.२८ ऑगस्ट,गुरुवारी,सकाळी १० वा.सुरू झाला.यात सर्व भाविक भक्तांनी सेवेत सहभाग घेत  हा कार्यक्रम यशस्वी केला. आयोजन समितीतर्फे मयूर चंदनकर,विनय चंदनकर,विजय पाटील ,योगेश पवार ,संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या