Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरश्रीराम  मंदिर संस्थान  वहनोत्सवास घोड्याच्या वहनाने उत्साह पूर्ण वातावरणात प्रारंभ..

श्रीराम  मंदिर संस्थान  वहनोत्सवास घोड्याच्या वहनाने उत्साह पूर्ण वातावरणात प्रारंभ..

जळगांव दि.२२(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधिनी एकादाशी निमित्त श्रीराम वहनोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दि.22 ऑक्टोबर बुधवार दिनी प्रारंभ होत असुन त्या निमित्त पहाटे ५ ते ७ काकडारती ,पुजाअभिषेक,मंगलारती, सकाळी ७ ते ८ रामप्रहर महिला मंडळ (रामपेठ) यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ व सामुदायिक रामजप करण्यात आला.सकाळी १०.३० वाजता निमखेडी शिवारातील श्रीराम मंदिर येथे पालखीचे प्रस्थान झाले.

प्रभुश्रीरामांची उत्सव मुर्तीस व श्रीसंत मुक्ताबाईंच्या पादूकांना जलाभिषेक पूजन श्री सद्‌गुरु अप्पा महाराजांच्या गुरुतुल्य ( श्री क्षेत्र वाघोड, ता. रावेर) येथील सदगुरु श्री कुंवरस्वामी महाराजांची पुण्यतिथी निमित्त भजन,आरती करण्यात आली.महाप्रसाद होवून पालखी दुपारी ४ वाजता श्रीराम मंदिरात परत आली. संध्याकाळी ६.०० वाजता वंशपरंपरेने प्रथम वाहनपुजन श्री सद्‌गुरु अप्पा महाराजांचे पाचवे वंशज ह.भ.प. श्री.मंगेश महाराज जोशी यांचे शुभहस्ते करण्यात आले. व जळगांव शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांच्या वेदमंत्र घोषात पुजनास प्रारंभ झाला.

यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार सुरेश भोळे,जळगाव म.न.पा.आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,शनिपेठ पो.स्टे.च्या पोलीस निरीक्षक कावेरी कलमाकर,रामानंद पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ,जळगाव शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक सागर शिंपी,एम.आय.डी.सी पो.स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड,
जिल्हा पेठ पो.स्टे.पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, जळगाव तालुका पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक अनंत अहिरे,नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे, नगरसेवक सुनील वामन खडके,नगरसेवक डॉ विरेन्द्र खडके,सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते कमलाकरजी बनसोडे,सुभाषचौक पतसंस्थांचे प्रतिनिधी,नगरसेवक भरत कोळी,नेहरू चौक मंडळाचे अजय गांधी,ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नितीन कुळकर्णी ,जळगाव पत्रकार संघाचे दिलीप शिरोळे,गिरीजी ठाकूर,अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,लताताई भोईटे माजी नगराध्यक्ष,दिलीप शिरोळे जळगाव जिल्हा पत्रकार,गोसेवक गिरीराज राठी, ओमकारेश्वर देवस्थानचे दीपक जोशी,अँड नारायणजी लाठी ज्येष्ठ विधीज्ञ,सामाजिक कार्यकर्ते अमित जैन, तसेच श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्त डॉ भरत अमळकर,भालचंद्र पाटील,ॲड सुशील अत्रे,शिवाजीराव भोईटे,विजय जोशी,जयवर्धन नेवे रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील,कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, रथोत्सवाचे सेवेकरी मंडळी व जळगाव नगरीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांचे उपस्थितीत पूजनास प्रारंभ झाला.
प्रभु श्रीरामरायांची आरती होवून रात्री ८ वाजता वहन दिंडीस जलग्राम प्रदक्षिणेस प्रारंभ करण्यात आलावहन मार्ग श्रीराम मंदिर,भोईटे गढ़ी, कोल्हेवाडा, आंबेडकर नगर,चौधरी वाडा,तेली चौक,राम मारुती पेठ, रथ चौक मार्गे सराफ बाजारातील श्री भवानी मंदिर येथे पानसुपारी,भजन भारुडांचा कार्यक्रम होवून वहन सुभाष चौक येथे सुभाष चौक पतसंस्था येथे पानसुपारी भजन भारुडाचा कार्यक्रम होवुन वाहन भिलपुरा मार्गाने बालाजी पेठेतील श्री बालाजी मंदिरात पानसुपारी,भजन भारुडाचा कार्यक्रम आरती होऊन. श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन वहन श्रीराम मंदिरात परत आले.वहन  रोज ज्या मार्गाने जाईल त्या मार्गावर भाविकांनी सडासंमार्जन करून रांगोळ्या काढुन व वहनास आरती देवून स्वागत करून रामचैतन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.दि.५ नोव्हेंबर पर्यंत चालणा-या या वहनोत्सवात वहनावर काष्टशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेले विविध देवतांची व प्राण्यांची विविध दिवशी वहने काढली जातील. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेवून तन, मन, धनाने सहकार्य करावे असे आवाहन संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प.मंगेश महाराज जोशी,विश्वस्त सर्वश्री,भरत अमळकर,भालचंद्र पाटील,ॲड.सुशिल अत्रे,शिवाजीराव भोईटे,जयवर्धन नेवे,तसेच रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील,कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील,विलास चौधरी,सुजित पाटील,भानुदास चौधरी आदींनी केले आहे.या वहनोत्सवाची स्थापना श्री सद्‌गुरु अप्पा महाराजांनी शके १७९४ साली प्रारंभ केला असुन यंदा 153 वे वर्षे आहे. जळगांव शहरात मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण यानिमित्त निर्माण झालेले दिसते, यंदाचा श्रीराम रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ह.भ.प.श्री.मंगेश महाराज जोशी यांचे मार्गदर्शनाखाली समस्त विश्वस्त मंडळी तसेच भालचंद्र पाटील, प्रभाकर पाटील, जयवर्धन नेवे,मुकुंद धर्माधिकारी,नंदू शुक्ल,सुजित पाटील, अरुण मराठे,राजू काळे,मुकुंदा पाटील, भानुदास चौधरी, भास्कर चौधरी,शिवा पाटील,दिनेश धांडे,किशोर पाटील,अविनाश येवले,किरण चव्हाण मिस्त्री,कवी कासार,राकेश लोहार,घनश्याम धर्माधिकारी,चैतन्य जोशी,भारत बारी,चंदन वाणी,नितीन चौधरी,हरिष बारी,अमोल खडके,परेश नेवे,छोटू नेवे,विकास शुक्ल, खंडू तांबट,विशाल सोनार,किशोर कोळी,किशोर नाटेकर,संजय कोरके,अजय लाडवंजारी,भाऊसाहेब दौलत ढाके,सरोदे भाऊ,भालचंद्र चौधरी,महेंद्र जोशी, विनायक जोशी,बाळू कोळी,रमाकांत जोशी, जानकिराम भोई,पवन तिवारी,बापू जोशी,दिलीप कोळी,प्रणव जोशी,सुनील वाणी,पराग जोशी, श्रीपाद जोशी,फडे गुरुजी,बाळू तिवारी, पोपट चोपदार,निंबा जगताप,संभाजी जगताप, रतन माळी,दिलीप राजपूत, केशव बारी, सिंधू ताई भोई,जगन टेलर,पपू सोनगिरे, रामा व रूपा कुंभार, कुंभार ताई, दीपक जोशी, उमेश साळी, जगदीश व चंदू भावसार, प्रणव कुलकर्णी, राजू भावसार, महेश दायमा, प्रकाश सोनार,राम प्रहर भजनी महीला मंडळ,, विठ्ठल कोळी, राजु कोळी, स्वप्निल शुक्ल, निखिल शुक्ल, देवेश पाठक,केशव भंडारी,रामभाऊ वाणी, शशी बारी,संजय भोईटे,बापू सोनार,दत्तभाऊ तेली,साकेत पाटील, सागर शिंपी,संतोष तांबट,अशोक माळी, बापू सपके,आदि परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या