Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरश्रीराम मंदिरात आज श्रीराम रथोत्सव निमित्त प्रक्षाळ महापूजा व श्री बाबजी महाराज...

श्रीराम मंदिरात आज श्रीराम रथोत्सव निमित्त प्रक्षाळ महापूजा व श्री बाबजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम..

जळगांव – दि.१० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
सोमवारी श्रीराम मंदिरात श्रीराम रथोत्सव निमित्त प्रक्षाळ महापूजा व श्री बाबजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेजळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमाने संपन्न झालेल्या श्रीराम रथोत्सव निमित्ताने प्रभू श्रीरामरायांना आलेला थकवा शिणवटा घालविण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही कार्तिक कृष्ण षष्ठी म्हणजे दि.१० नोव्हेंबर या दिवशी प्रक्षाळ महापूजा होईल.

भाग गेला शीण गेला l अवघा झालासे आनंद l 

मोठ्या रामरायांच्या व श्रीराम रथात विराजमान होणारी प्रभू श्रीरामराजांची चैतन्यमय उत्सवमूर्ती व इतर देवता सह आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या पादुकांचे महाभिषेक करण्यात आला पंचामृत,उष्ण उदक पंढरीची चंद्रभागा व नाशिकच्या गोदावरी , मेहुणच्या तापी पूरणा,व जलग्राम (जळगावची) गिरणा इ.पवित्र पंच नदीच्या जलाने विविध वनस्पतीचे मिश्रण केलेला काढा इत्यादी उपचारांनी वेदमंत्र घोष करीत महाभिषेक करून महाआरती होईल. याच दिवशी श्रीराम रथोत्सव संस्थापक श्री सद्गुरू आप्पा महाराजांचे अवलिया मित्र श्री सद्गुरू बाबजी महाराज यांची ११६ वी पुण्यतिथी त्यानिमित्त संध्याकाळी मंदिरातील संत खोलीतील श्री बाबजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भजनाचा कार्यक्रम होईल.जुन्या जळगावातील गोपाळपुरा येथील श्री सद्गुरू आप्पा महाराजांनी बांधलेल्या श्री सद्गुरू बाबजी महाराज समाधी येथे जाऊन ह.भ.प.श्री श्रीराम महाराजांचे श्री सद्गुरू बाबजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभंग आरती होईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या