
जळगांव- दि.१२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
शारदा वेदपाठशाळेचा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम श्री समर्थ रामदास स्वामी मंदिरात उत्साहात साजरा झाला, कार्यक्रमाचे आयोजन शारदा वेदपाठशाळे तर्फे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी श्री परशुराम प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.मान्यवरांनी उपस्थित ब्रह्मवृंदांना दिशादायक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमला बहुभाषिक ब्राह्मण संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री नितीन पारगावकर,ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अशोक वाघ,अध्यक्ष कमलाकर फडणीस,जिल्हा ब्राह्मण संघटनेचे श्री वसंत देखणे, तसेच पुरोहित ब्राह्मण संघाचे ज्येष्ठ श्री नंदू शुक्ला यांची कार्यक्रमाचे अतिथी विशेष म्हणून उपस्थित लाभली.त्यांचा यथोचित सत्कार पाठशाळेच्या वतीने करण्यात आला.
सर्व अतिथीनी सर्व पुरोहित बंधु यांना कोजागिरी निमित्ताने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे सूत्र संचालन दीपक कुलकर्णी गुरुजी यांनी केले.उद्बोधन झाल्या वर सर्वांनीच जेवणाचा व मधुर दुधाचा आस्वाद घेतला,त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
शारदा वेद पाठशाळेत कोजागिरी उत्साहात साजरी..मान्यवरांचा झाला सत्कार
RELATED ARTICLES
