Monday, July 7, 2025
Homeजळगांव शहरवुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस आयोजित रक्तदान शिबीरात सहा रणरागिणींचे रक्तदान...

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस आयोजित रक्तदान शिबीरात सहा रणरागिणींचे रक्तदान…

जळगाव – दि.२९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) काल  दि.२८ रोजी एस.एम.आय.टी.कॉलेज परिसरात झालेल्या रक्तदान शिबीरात ६ रणरागिणींनी रक्तदान करुन महिलाही राष्ट्र कार्यात मागे नाही हे सिध्द करुन दाखविले आहे.

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस आणि जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १६ जणांनी रक्तदान केले.विशेष बाब म्हणजे ६० वर्षे वय असलेल्या सरला राजेंद्र सुर्यवंशी यांनी स्वतः रक्तदान करुन आपल्या विद्यार्थ्यांचेही रक्तदान करविले म्हणून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत होते. उद्घाटन कार्यक्रमात रेडक्रास रक्त केंद्राचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉसच्या संचालक पुष्पात भंडारी,मंगला ठोंबरे,उषा शर्मा, वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लसच्या अध्यक्ष व रेड क्रॉसच्या संचालक शांता वाणी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संभाजीराव देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. दिपप्रज्वलना नंतर शांता वाणी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती करून दिली.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.डॉ.रेदासनी यांनी रक्तदानाचे महत्व विशद करुन सावली या संस्थेची माहिती दिली .हे केंद्र रेड क्रॉसच्या माध्यमातून आपण जळगावी सुरु करिता असल्याचे नमुद केले.शेवटी शालिनी चौधरी हीने आभार प्रदर्शन केले.सुत्रसंचलन हेमलता कुलकर्णी यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या