जळगाव : दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)ओपन लिंक फाउंडेशनच्या‘ विनोबा ’डिजिटल शैक्षणिक व्यासपीठा तर्फे फेब्रुवारी २०२६ या कालावधी तील जिल्हा स्तरीय”पोस्ट ऑफ मंथ”सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.या उपक्रमासाठी CEO मीनल करणवाल यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण व विद्यार्थीकेंद्रित कार्याचा गौरव करण्यासाठी ‘विनोबा’तर्फे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून,यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.पोस्ट ऑफ मंथ अंतर्गत अंजली पाटील (तरवाडे बु.चाळीसगाव) ,विनोद धनगर (सारोळा बु.,पाचोरा),शीतल पाटील (सुमठाणे ,पारोळा) ,मनिषा अहिरे(फैजपूर,यावल) आणि ज्योती चौधरी (गोंडगाव,भडगाव)यांचा सन्मान करण्यात आला.
सकाळची सभा स्पर्धेत मनिषा पवार (खर्ची खु.एरंडोल),चंद्रकांत विसपुते (करमाड ,जामनेर) आणि जितेंद्र पाटील(मोरगाव खु.रावेर) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.स्पोकन इंग्लिश विभागात राहुल पाटील (बिडगाव, चोपडा)यांनी यश संपादन केले.
स्कॉलरशिप सराव चाचणीत वर्ग ५ मध्ये डॉ. शामकांत रुले(कोठाली,मुक्ताईनगर),दिनकर पाटील (धानोरे,धरणगाव)आणि सुवर्णा बोरसे (पांढरड, भडगाव)तर वर्ग ८ मध्ये अवधूत जाधव (तळेगाव, जामनेर),उषा माळी(धानवड,जळगाव) आणि पालवे मॅडम(कुसुंबा,जळगाव) यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास डेप्युटी सी.ई.ओ.रणधीर सोमवंशी, शिक्षणाधिकारी निलेश पाटील,(प्राथमिक)तसेच उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे (प्राथ)व उप शिक्षणाधिकारी(प्राथ)नरेंद्र चौधरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात विनोबा टीमचे जिल्हा समन्वयक हितेश भालेराव व सचिन ससाणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत संपूर्ण व्यवस्थापन प्रभावीपणे पार पाडले.
‘विनोबा’उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांच्या कार्याला योग्य व्यासपीठ मिळत असून,त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक व प्रेरणादायी बदल घडत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल टीम विनोबा,जळगाव यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
विनोबा’ उपक्रमातून जळगाव जिल्ह्यात ” पोस्ट ऑफ मंथ “सन्मान सोहळा उत्साहात संपन्न..
RELATED ARTICLES
