Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरवाचन माणसाला घडवते आणि देशालाही -डॉ.विलास नारखेडे...बहिणाबाईत आनंददायी शनिवारचा उपक्रम..

वाचन माणसाला घडवते आणि देशालाही -डॉ.विलास नारखेडे…बहिणाबाईत आनंददायी शनिवारचा उपक्रम..

जळगांव- दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित करणे व त्यांना ताणतणाव मुक्त आणि आनंददायी वातावरणात शिक्षण देणे या उद्देशाने आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला.
हसत- खेळत वातावरणामध्ये एखाद्या कृतीच्या माध्यमातून काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट शिकण्यासाठी शनिवारच्या दिवशी बहिणाबाई विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला.सकाळच्या प्रसन्न वातावरणा कथा,कविता,ललित पुस्तके,छोट्या गोष्टींची पुस्तके,गणित,विज्ञान,खेळ विषयाची शिक्षणाशी संबंधित पुस्तके यामुळे रोवला गेलेला ग्रंथालयाचा पाया आपल्या लेखणीतून अख्या भारताला उत्तुंग स्वप्न पाहण्याचे बळ देणाऱ्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून मुख्याध्यापक डॉ.विलास नारखेडे व शिक्षकांनी हा वाचन कट्टा निर्माण केलेला आहे.वाचनामध्ये आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य असल्याचा संदेश डॉ विलास नारखेडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना देऊन वाचन हे विद्यार्थी,माणसे यासोबत देशाला घडवते सन २०१७ पासून असलेला मुख्याध्यापक डॉ.नारखेडे यांच्या प्रेरणेतून साकार झालेला आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांना जोडणारा दुवा म्हणजे वाचन कट्टा .विद्यार्थ्यांना अभ्यास,करियर या विषयाच्या विविध प्रकारच्या शंका या ठिकाणी सोडवता येतात, विषय शिक्षक संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते असे वाचन कट्टा बनवण्याचा उद्देश आहे.या वाचन कट्ट्यात विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी लेखन, व्यवसायिक लेखन,ई-बुक,हस्तलिखिते,स्व प्रकाशन,शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी,विविध प्रकारचे लेखन अशा निरनिराळे प्रकारचे साहित्य ठेवण्यात आलेले आहे.स्वामी विवेकानंद ग्रंथालयातून रोज एक पुस्तक वाचत व देश शक्तिशाली होण्यासाठी अवांतर वाचनाची सुरुवात आवड निर्माण शिवाजी महाराजांना जिजामातेने पराक्रमाच्या गोष्टी सांगून त्यांच्या शौर्याला आकार दिला. होता.डॉ बाबासाहेबांनी वाचाल तर वाचाल ही संकल्पना स्पष्ट केली,बहिणाबाईच्या कविता लोकांनी लिहून ठेवल्यामुळे जीवन जगण्याचा ठेवा लोकांना समजला पुस्तकाचे जग विलक्षण आहे.त्याचा आनंद चांगल्या प्रकारे घेतला तर पुस्तकातील पान आयुष्य बदल करू शकेलएवढी ताकद त्या वाचनात आहे रामायण, महाभारत ,भगवद्गीता,पंचतंत्र यातून भारतीय जीवन मूल्य प्रतिबिंबित होतात असे डॉ.नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.म्हणून मुलांना वाचण्याची गोडी लागण्यासाठी छोट्या पुस्तकांपासून सुरुवात करण्यात आली. त्यांच्या आवडीच्या विषयाचे त्यांना वाचू देण्यात आले.पुस्तक हातात घेणे, बघणे ,चाळणे अशा सहजरित्या गोष्टी सुद्धा त्यांना यावेळी करू दिल्या. मुक्तपणे कार्यत्यांना यावेळी करू दिले जाते. या उपक्रमात समन्वयिका प्रतिभा खडके अजय कुवर सीमा चौधरी राजेश वाणी विशाल पाटील महेंद्र पाटील संतोष सोनार डी एस चौधरी व विद्यार्थी मित्रांनी सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या