Tuesday, October 7, 2025
Homeजळगांव शहररोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थतर्फे आरोग्य तपासणी शिबीर..

रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थतर्फे आरोग्य तपासणी शिबीर..

जळगाव – रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ, श्री हरी मंदिर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व महादेव हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रविवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी न्यू पोस्टल कॉलनीतील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले असून नागरिकांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.स्व. मनोज वारके यांच्या स्मरणार्थ आयोजित या शिबिराप्रसंगी धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गोदावरी फाऊंडेशन संचालिका तथा भाजपा जळगाव जिल्हा पूर्वच्या सर चिटणीस डॉ केतकीताई पाटील, डॉ पंकज पाटील,डी एम कार्डिओलॉजिस्ट डॉ वैभव पाटील,कैलास भोळे, चंदन कोल्हे, रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ चे प्रेसिडेंट बिपिन पाटील, सेक्रेटरी हितेंद्र धांडे,भरत कर्डिले, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ शौनक पाटील, जयेश बहिरम, प्रशांत अग्रवाल, रुपेश सरोदे, कश्मिरा जैन, रिंकू चौधरी, हितेश जावळे, मुकेश महाजन, गिरीश भोळे आदी उपस्थित होते. यावेळी ईसीजी, डोळ्यांची तपासणी, रक्त तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या येथे तज्ञ् डॉक्टरांद्वारे करण्यात आल्यात. याप्रसंगी ५५ शिबिरार्थींचे इसीजी तपासणी करण्यात आली असून रिपोर्टनुसार पुढील उपचाराबद्दल माहिती देण्यात आली. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या