Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहररामानंद पो.स्टे.तर्फे सरदार पटेल जयंती निमित "रन फॉर युनिटी" दौड चे उत्साही...

रामानंद पो.स्टे.तर्फे सरदार पटेल जयंती निमित “रन फॉर युनिटी” दौड चे उत्साही आयोजन ..

जळगांव – दि.३० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० वी जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येणार आहे.जयंती निमित्त रामानंद पोलिस स्टेशन तर्फे भव्य स्वरुपात “रन फॉर युनिटी” दौडचे आयोजन दि.३१ रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.त्या निमित्ताने रामानंद नगर पोलीस स्टेशन तर्फे आयोजित “रन फॉर युनिटी” हा कार्यक्रम सागर पार्क-काव्यरतनावली चौक ते डी मार्ट ते सागर पार्क असा आयोजित करण्यात आलेला आहे.तरी सदर कार्यक्रमास येताना टी-शर्ट व ट्रॅक पॅन्ट परिधान करून जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.जळगांव जिल्हा पोलिस दल व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शना खाली धावण्याचा हा उपक्रम युवा,महिला तसेच सर्व वयो गटातील नागरिक ज्येष्ठांसाठी आयोजित करण्यात आला आहे.यात शहरातील सर्व सार्वजनिक,सामाजिक संस्था ,शैक्षणिक संस्था,विद्यार्थी,विद्यार्थिनी,देशभक्त नागरिक अश्या सर्वांनी सक्रिय सहभाग घेवून सरदार वल्लभ पटेल यांच्या कार्याचे स्मरण करून प्रेरणा घेत या उपक्रमाला सहकार्य करून यशस्वी करावे असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे रामानंद पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या