(रक्तदान जनजागृती कार्याचे ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी स्वयंस्फूर्त रक्तदान करतांना सोबत महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव आदरणीय ना.गुलाबराव पाटील संपर्कप्रमुख श्री.सुनील चौधरी,मा.महापौर श्री विष्णू भंगाळे व मान्यवर)
जळगांव – दि.६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) “रक्तदान म्हणजे केवळ सामाजिक जबाबदारी नव्हे, तर ती मानवी जीवन वाचवण्याची श्रेष्ठ सेवा आहे. रक्तदात्यांना दिलेले हेल्मेट हे केवळ वस्तू नाही, तर तुमचं आयुष्य सुरक्षित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांनी समाजात सकारात्मकतेचा प्रसार होतो.”असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना जनतेचा भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाशिक येथील SMBT हॉस्पिटल मधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची सखोल तपासणी करण्यात आली. अनेक गरजूंना मोफत औषधे देण्यात आली, तर काही रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले.
शिबिरात सहभागी तज्ज्ञ डॉक्टर
डॉ.अशोक साळुंखे (मेडिसिन),डॉ.शुभम शेळके (सर्जरी),डॉ.वैभव खताळ,डॉ.चिन्मय क्षीरसागर (कान,नाक,घसा),डॉ.सूर्यकांत पाटील व नितीन कोळी,SMBT टीम.या उपक्रमाअंतर्गत पाळधी येथील श्रीराम मंदिर परिसरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. रेडप्लस ब्लड बँक (जळगाव) यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात ५९ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. *शिबिराची सुरुवात मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांच्या रक्तदानाने झाली.
वाहतूक सुरक्षेसाठी अभिनव संकल्पना
या शिबिरात सहभागी ५९ रक्तदात्यांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. नागरिकांचे प्राण वाचवणारे रक्तदान करणा-या हातांना वाहतूक सुरक्षेचे कवच देण्याची ही कल्पना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने राबवली. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दाद दिली.उपस्थित मान्यवर
रक्तदान जनजागृती कार्याचे ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र गवळी, डॉ. मोईज देशपांडे, भावेश ढाके, विशाल निकम, दीपक पाटील, दीपक माळी, चेतन तांबोळी, अनिकेत बोराडे, प्रदीप माळी, गणेश शेळके, शुभम गवळी, क्रिश सनकत, राहुल पाटील, प्रदीप पारधी, प्रशांत निंबाळकर आदींची उपस्थिती लाभली.