जळगाव – दि.२९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
न्याय व्यवस्थेमध्ये आपण काम करत असताना फक्त आपल्या पक्षकाराचीच प्रामाणिक तर तुम्ही राहतातच मात्र येणाऱ्या पिढीने व वकिली करू इच्छितांनी हे निश्चितच लक्षात ठेवावे की सगळ्याच प्रकारे आपण प्रामाणिक आणि मूल्याधिष्ठित वकिली करावी कोणत्याही प्रकारची तडजोड आपल्या वकील क्षेत्रात करता कामा नये आज ज्यांच्या नावे हे पुरस्कार वितरित केले जात आहेत त्यांनी कायम मूल्याधिष्ठित वकिलीवर भर दिला यावर त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही याच मूल्यांवर आधारित प्रामाणिक वकिलीवर न्यायव्यवस्थेवर येणाऱ्या तरुण पिढीने नवे इच्छूक वकिलांनी भर द्यावा असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती मा.श्री.एस.व्ही. गंगापूरकर वाला यांनी अत्रे प्रतिष्ठान आयोजित अग्रणी पुरस्कार वितरण समारंभात आपले मत व्यक्त केले.येथील गुरुवर्य अ. वा.अत्रे प्रतिष्ठान व शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रविवार दि.२९ जून रोजी ज्येष्ठ विधिज्ञ स्व. अच्युतराव अत्रे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘अग्रणी’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या वतीने ॲड.स्व.अ.वा.अत्रे यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचावे या उद्देशाने या पुरस्काराचे वितरण यंदापासून करण्यात येणार आहे. यंदाचा हा अग्रणी पुरस्कार ॲड.व्ही.एन.आगाशे (ठाणे) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ठाणे येथील आगाशे गेल्या अनेक वर्षांपासून वकिली क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर संत, पदमश्री उज्ज्वल निकम, शि प्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप जोशी हा त्याच्यानंतर म्हणून निवड समिती सदस्य व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जेष्ठ शिक्षणतज्ञ अनिल राव , डॉ. पंडित विद्यासागर, ॲड सुशील अत्रे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
विधी व न्याय, शैक्षणिक या दोन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येणार आला. यावर्षी विधी व न्याय क्षेत्रात कार्यरत ॲड. व्ही. एन. आगाशे (ठाणे) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, स्मृतीचिन्ह, चांदीचा शिक्का, मानपत्र यावेळी पुरस्कार स्वरूपात निवृत्त न्यायमुर्ती संजय गंगापुरवाला व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
प्रस्तावना सुशील अत्रे यांनी करत या पुरस्काराविषयी प्रतिष्ठानाची भूमिका स्पष्ट केली.
७ सदस्यीय समितीद्वारे पुरस्काराची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरावर दरवर्षी यंदापासून हा पुरस्कार विधी व न्याय, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात येणार आहे. या निवड समिती मध्ये शि. प्र. मंडळाचे व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, प्रा. अनिल राव, माजी कुलगुरू पंडित विद्यासागर तसेच कायदा विभागातून पद्मश्री उज्वल निकम एडवोकेट जयंत जायभावे, माजी न्यायमूर्ती साधना जाधव,ॲड. मीरा खडककर यांचा या निवड समितीत कायमस्वरूपी समावेश आहे.यावेळी सत्कारमूर्ती आगाशे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की ज्यांनी कायम आपल्या मूल्याधारीत निष्ठेवर कार्य करीत आपल्या तत्त्वानुसार न्यायप्रविष्ठेला अनुसरून आपले कार्य केले अशा माननीय अच्युतराव अत्रे यांच्या नावाने मला आज हा पुरस्कार वितरित करण्यात येतो आहे याचा मला नितांत अभिमान आणि आनंद आहे येणाऱ्या पिढीचे देखील याच पद्धतीने न्यायव्यवस्थेवर आपले कार्य करीत पुढील वाटचाल करावी अशी अपेक्षा करतो तसेच माझ्यासारख्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान केला याबद्दल मी निवड समिती व संपूर्ण अत्रे कुटुंबीयांचे आभार व्यक्त करतो व येणाऱ्या पिढीने देखील याच पद्धतीने आपले मार्गक्रमण करावे अशी आशा बाळगतो असे मत व्यक्त केले प्रसंगी सूत्रसंचालन ॲड.आनंद मुजुमदार यांनी केले तर तपन संत यांनी आभार मानले. यावेळी शि. प्र. मंडळाचे सर्व सदस्य व कर्मचारी तसेच अत्रे प्रतिष्ठानचे सर्व सहकाऱ्यांचे सदस्यांचे सहकार्य मिळाले.
युवा पिढीने मुल्याधारीत प्रामाणिक वकिलीवर भर द्यावा – एस.व्ही. गंगापूरकरवाला…ॲड.व्ही.एन.आगाशे (ठाणे) यांना अत्रे प्रतिष्ठानाचा ‘अग्रणी ‘ पुरस्कार प्रदान..
RELATED ARTICLES