Monday, July 7, 2025
Homeआरोग्यमुकुंद गोसावी रक्तदान जनजागृतीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर

मुकुंद गोसावी रक्तदान जनजागृतीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर

जळगाव – दि.१७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता ,सामाजिक, आरोग्य क्षेत्रात निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे सेवारत असलेले आरोग्य दुत, रक्तमित्र मुकुंद गोसावी यांची रक्तदान जनजागृती कार्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर (स्टार प्रचारक)म्हणून नुकतीच निवड जिल्हा सामान्य रुग्णालया तर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी केली.तप्त उन्हाळा असल्याने सुरळीत रक्तपुरवठ्याकरिता अडचण येत असते थैलेसेमिया,हिमोफिलिया सिकलसेल,गंभीर रुग्ण, रक्तक्षय असलेल्या तसेच प्रसूती करता येणाऱ्या माता यांना नियमित रक्ताची गरज असते सोबतच सर्वत्र सध्या राष्ट्रासाठी महत्वपूर्ण मिशन सिंदूर उपक्रम सुरू असल्याने रक्त संकलनाकरिता प्रशासनासोबत आरोग्य विभाग ही कार्यरत आहे.रक्तदाते मुकुंद गोसावी हे नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करून स्वतःही वेळोवेळी रक्तदान करीत असतात त्यांनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले असून सुदृढ समाजाला त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याने शहरासह ग्रामीण भागातही रक्तदानाचे प्रमाण वाढावे याकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे.मुकुंद गोसावी यांनी कोरोना काळातही दिव्यांग मोटरसायकल द्वारे आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा केली होती, तसेच कोरोना लसीकरण कार्याचेही ते स्टार प्रचारक होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या