Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरमुकुंद गोसावी यांना समाज भूषण पुरस्कार..

मुकुंद गोसावी यांना समाज भूषण पुरस्कार..

जळगाव – दि.२४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) खान्देश दशनाम गोसावी समाज संस्था धुळे,जळगाव ,नंदुरबार तर्फे भव्य विशेष गुणगौरव समारंभ मेळाव्याचे आयोजन नुकतेच देवपूर परिसर धुळे येथील गोसावी समाज सभागृह येथे करण्यात आले होते यावेळी राज्यभरातील समाज प्रतिनिधी विविध स्तरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी समाजातील प्रथितयश व्यक्तिमत्व मुकुंद गोसावी हे सामाजिक बांधिलकी जोपासत सदैव निरपेक्ष सेवाकार्य करून प्रत्यकाला मदत करीत असतात.मोठे शारीरिक व्यंग असूनही आपल्या जवळ जे नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानून इतरांची मदत करण्यात मुकुंद गोसावी यांचा समाजात पुढाकार असतो.आरोग्य व रक्तदान सेवेत त्यांचे योगदान मोठे असल्याने त्यांचा विशेष स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या