जळगाव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
मांगल्य सेवा संस्थेतर्फे जाहिर आवाहन करून हिवाळ्यासाठी ऊबदार कपडे, इतर कपडे तसेच साड्या संकलित केल्या होत्या.
त्याचे गरजूंना वाटप करण्याचा कार्यक्रम रविवार दि.०४ जाने. रोजी सकाळी १० वाजता श्री संत कंवरराम नगर जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
मान्यवर अतिथी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या कपड्यांचे वाटप करण्यात आले.
त्या अगोदर संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र कुळकर्णी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.अध्यक्ष प्रविण कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना सामाजिक उपक्रमाची व संस्थेच्या पुढील कार्याची,वाटचालीची माहिती दिली.संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वश्री सुनील काजळे, ॲड.सौ.योगिनी देशमुख ,सौ.विनीता नेहेते,सौ.प्राची कुळकर्णी ,किरण दिनकर कुळकर्णी यांनी संस्थेकडे कपडे संकलित करून पाठवले होते.
या सेवाभावी उपक्रमातून गरजू व्यक्तींच्या जीवनातील खडतर संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न या आयोजनातून करण्यात आला.तसेच संस्थेच्या वतीने वर्षभर अल्यल्प दरात गरजू रुग्णांना वैद्यकीय साहित्य वापरण्यासाठी देण्याचे कार्य केले जाते.याप्रसंगी श्री संत कंवरराम नगर येथे असलेले वृध्दाश्रमास भेट देवून तेथे असलेल्या वृध्दांची भेट घेण्यात आली.त्या सेवाभावी कार्याला जवळून पाहण्याची संधी संस्थेच्या पदाधिकारी, सभासदांना मिळाली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रविण कुळकर्णी ,उपाध्यक्ष रविंद्र कुळकर्णी,सदस्य राजेश कुळकर्णी,देवीदास भट, किरण कुळकर्णी ,सौ.प्राची कुळकर्णी,सौ.स्वाती कुळकर्णी ,सौ.राजश्री जोशी,कु.समृध्दी कुळकर्णी,कु.आर्या कुळकर्णी,तसेच मनोज कुकरेजा,जगदीश महाराज (गुरुजी),संजय लुल्ला,धर्मसाथी लाईव्ह न्यूजचे संपादक प्रसाद जोशी, प्रबोधचंद्रीकेचे संपादक कमलाकर फडणीस,व इतर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी सौ.प्राची कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्यास हातभार लावणाऱ्या तसेच या उपक्रमात सहभाग घेणाऱ्या सर्वांचे संस्थेतर्फे आभार मानले.
मांगल्य सेवा संस्थेतर्फे गरजूंना करण्यात आले उबदार कपड्यांचे वाटप …राबवला सेवाभावी उपक्रम
RELATED ARTICLES
