
जळगांव -दि.१६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
अमृतच्या खुल्या गटातील ओपन कॅटेगिरीच्या साठी ही संस्था काम करत आहे.ज्यात ब्राह्मण मारवाडी अग्रवाल सिंधी बंगाली गुजराती इत्यादी समाज येतात या जिल्हा मेळाव्यास हे सर्व समाजाचे प्रतिनिधी व समाज बंधू भगिनी हजर होत्या.
यावेळी जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने तसेच ब्रह्मश्रीचे प्रेरणास्थान अशोक वाघ ब्रह्मश्री चे अध्यक्ष कमलाकर फडणवीस वार्षिक समाजाचे अध्यक्ष नितीन पारगावकर ,गुजराती समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत भाई गुजराती,अग्रवाल समाजाचे पवन मित्तल ,भुसावळचे श्याम दरगड,सिंधी समाजाचे चाळीसगावचे लक्ष्मण नागवानी यावेळी उपस्थित होते.
यावेळी अमृतचे महाराष्ट्राचे राज्य समन्वयक दीपक राव जोशी,नाशिक विभागीय अधिकारी मंगेश खाडिलकर जळगाव जिल्ह्याचे अमृतचे व्यवस्थापक राजेंद्र कानडे, नाशिकचे जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी,जळगावचे उपव्यवस्थापक दीपक गुप्ता,अमृत मित्र प्रज्योत कुलकर्णी,जालन्याचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबी यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी केले सूत्रसंचालन दीपक गुप्ता यांनी केले अमृतच्या सर्व योजनांची माहिती राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी केले तसेच यावेळी या लाभार्थ्यांना अमृतच्या योजनांचा लाभ मिळालेला आहे तेही यावेळी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.एम सी डी दिनेश पाटील तसेच लढ्ढा क्लासचे अमित लढ्ढा यांनी या अभ्यासक्रमाचे सर्व समाजासमोर सादरीकरण केले हा अभ्यासक्रम पूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात सुरू झालेला असून हा एक जळगाव जिल्ह्यात मानबिंदू ठरलेला आहे. या सर्व अमृतच्या योगदानात अमृतचे कार्यकारी संचालक श्री विजय जोशी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन अमृत या व्यवस्थेत व अधिकाऱ्यांना वेळोवेळी मिळत असते.
या अमृतच्या कार्यक्रमासाठी आलेले जळगाव जिल्ह्यातील अनेक समाज बंधू हजर होते यावेळी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं राज्य समन्वयक श्री दीपक जोशी यांनी समर्पक उत्तरे दिलीत तसेच राज्यभरात अमृत द्वारे दुर्ग उत्सवाचे नुकतेच उद्घाटन बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या शिवसृष्टी पुणे येथे झाले याचा याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे सादरीकरणही प्रोजेक्टर द्वारे पाहुण्यांसाठी करण्यात आले व सर्वांना आवाहन करण्यात आले की दिवाळीच्या सुट्टीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या दुर्ग उभारणीत सहभागी होऊन आपली दुर्ग किल्ल्यांसमोर सेल्फी घेऊन अमृतच्या वेबसाईटला पाठवून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वाक्षरीचे पत्र ऑनलाइन विद्यार्थ्यांना मिळणार आहे याबाबतची ही माहिती श्री दीपक जोशी यांनी दिली.
यावेळी जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री सतीश राव मदने यांनी आपले अमृत साठी काय लाभार्थ्यांसाठी काय योगदान असेल याबाबतची सर्व आलेल्या समाज बंधूंना माहिती दिली व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी वैयक्तिक व्याज परताव्यासाठी जळगाव सहकारी बँकेचे अर्थसहाय्य घ्यावे असे लाभार्थ्यांना आवाहन केले.
अमृत ने आता ऑनलाईन साठी एक नवीन धाडसी पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे त्या अंतर्गत अमृतपेठ या विषयाची मांडणी राज्य समन्वयक श्री दीपक जोशी यांनी लक्षित समाजास सांगितले व आवाहनास प्रतिसाद उपस्थित समाजाने दिला.आपल्या व्यवसायाची ऑनलाईन नोंदणी केली.यावेळी सौ सविता कानडे यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली तसेच आभार श्री दीपक गुप्ता यांनी मानले.
