जळगाव – दि.२७ मे. (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) – महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत प्रभावी अंमलबजावणीबाबत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जळगावचे श्री. स्वप्नील पाटील, जिल्हा समन्वयक, महा-आयटी यांना राज्यस्तरीय गौरव प्राप्त झाला आहे.मुंबई स्थित राज्य लोक सेवा हक्क आयोगाचे आयुक्त श्री.मनुकुमार श्रीवास्तव यांच्या शुभहस्ते त्यांना सन 2022 ते 2025 या कालावधीत केलेल्या कार्यासाठी प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या गौरवप्रसंगी राज्य लोक सेवा हक्क आयोग, नाशिक विभागाच्या आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी, यांची विशेष उपस्थिती होती.
हा सन्मान जळगाव जिल्ह्यातील सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रयत्नांना प्राप्त झालेली मान्यता आहे.
महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीतील उल्लेखनीय कार्याबद्दल जळगावचे श्री. स्वप्नील पाटील यांचा गौरव…
RELATED ARTICLES