जळगांव – दि.१६(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
महाराष्ट्र ज्युदो असोशिएशन व पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय पंच शिबिराचे आयोजन दिनांक १३ ते १५ जून दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम,बालेवाडी म्हाळुंगे,पुणे येथे करण्यात आले.शिबिराच्या सांगता समारंभात महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक तसेच सचीव दत्ता आफळे सर यांनी जळगाव जिल्हा ज्युदो असोशिएशनचे अध्यक्ष विष्णुभाऊ भंगाळे यांनां महाराष्टाचे आराध्य दैवत विठ्ठल रखुमाईची मूर्ती सप्रेम भेट दिली,
या प्रसंगी जळगांव जुदो असोसिएशनचे अध्यक्ष व जळगांव जिल्हा शिवसेना अध्यक्ष श्री विष्णुभाऊ भंगाळे यांना मूर्ती सुपूर्द करतांना जिल्हा असोशिएशनचे सचिव डॉ उमेश पाटील,अजय काशीद,डिंगबर महाजन आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र ज्युदो असो. व पुनीत बालन ग्रुप संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यस्तरीय पंच शिबिराची सांगता..
RELATED ARTICLES