जळगांव – दि.३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
३ जुलै २०२७ रोजी प.पू.श्री नारायण काका ढेकणे महाराजांची १०० वी जयंती जगभरात विविध उपक्रमांनी साजरी होणार आहे.गेल्यावर्षी ३ जुलै २०२४ पासून त्रेवार्षिक शताब्दी महोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली.
जळगाव महायोग (सिद्धयोग) साधना केंद्रात त्या दिवसापासुन प्रत्येक रविवारी सामुहिक साधना,प.पू. श्री.लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज (प.पू.नारायणकाका महाराजांचे दिक्षा गुरु) यांचे चरित्र अवतरणिका वाचन,रामरक्षा, भिमरुपी (मारोतीस्तोत्र) ,सिद्धमंगल स्तोत्र,दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..या महामंत्राचा जप,आरती,प्रसाद इ.उपक्रम नित्य नियमाने चालू आहेत.पहिल्या रविवारी केंद्र स्थानी स्वातंत्र्य चौकात व इतर रविवारी कुठल्यान कुठल्या साधकाच्या घरी हा कार्यक्रम पार पडतो.
प.पू.नारायण काका महाराजांनी सिध्दयोग पूर्वाभ्यास प्रचार-प्रसार करण्याचे सर्वसाधकांना सुचित,प्रेरित केल्या मुळे त्या सदर्भात सविस्तर माहिती देणारे पत्रके वाटणे,मुख्य मंदिरात बॅनर लावणे,शहरतील विविध भागात भेटी देवून महायोग साधनेबाबत माहिती देणे इ.उपक्रम चालू आहेत व ते जुलै २०२७ पर्यंत चालतील.अधुन मधुन मुख्य केंद्र नाशिक येथून प.पू.श्री.प्रभुणे महाराज,प.पू.श्री. निटूरकर महाराज,प.पू.श्री ठकारकाका महाराज,यांच्या भेटी व मार्गदर्शनाचा लाभ साधकांना,जिज्ञासुंना होत असतो.आज दि.०३/०७/२०२५ रोजी सकाळी ६.०७ मि ते ६.२८ मि.एकूण २१ मि.पूर्वाभ्यास वैश्वीक पातळीवर होणार आहे,तसाच तो जळगाव केंद्रातही होणारआहे.