जळगांव – मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व २९ महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आजपासून सर्व मनपा क्षेत्रात आचार संहिता लागू झाली आहे.
२,८६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहात आज दि.१५ रोजी आयोजित विशेष पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली.तसेच पत्रकारांच्या निवडणुकी संदर्भातील विविध शंका,प्रश्नाचे निरसन केले.एकूण ३९००० केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यानुसार या प्रक्रियेची तयारी पूर्णत्वाला जात आहे.त्यांनी दिलेल्या माहिती नुसार अर्ज दाखल सुरुवात – २३ डिसेंबर २०२५,अर्ज दाखल अंतीम तारीख -३० डिसेंबर २०२५,अर्ज छाननी -३१ डिसेंबर २०२५,अर्ज माघारी अंतीम तारीख- २ जानेवारी २०२६,चिन्ह प्रदान – ३ जानेवारी २०२६,मतदान – १५ जानेवारी २०२६,मतमोजणी -१६ जानेवारी २०२६ या प्रमाणे ही निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुका १५ जानेवारी रोजी…एकूण २९ मनपांचा कार्यक्रम जाहीर..२,८६९ जागांसाठी निवडणूक होणार..१६ जानेवारी मतमोजणी ..
RELATED ARTICLES
