जळगांव – दि.३१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
शहरातील महपालिका निवडणुकीत प्रभाग १२-ब मधून तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर उमेदवार वैशाली पाटील यांचा अर्ज बाद झाल्याने त्या प्रभागातील भाजपा उमेदवार माजी महानगर अध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे बिनविरोध झाल्या असल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला.या निर्णयाचे वृत्त जाहीर होताच भाजपा तर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रभागात चौघी जागा लढती साठी महायुती माध्यमातून भाजपा उमेदवारांना मिळाल्या आहेत.त्यात १२-अ मधून अनिल अडकमोल,१२-ब मधून उज्वला बेंडाळे १२-क मधून गायत्री इंद्रजित राणे १२-ड मधून नितीन बर्डे यांना उमेदवारी मिळालेली आहे.दि.३१ रोजीच्य अर्ज छाननी प्रक्रियेत भाजपा ए.बी फॉर्म नसताना वैशाली निवृत्ती पाटील यांनी ३ अर्ज एकाच प्रभागात भाजपातर्फे दाखल केले असल्याने त्यांचा अर्ज ब व ड मधून तांत्रिक मुद्यावर रद्द करण्यात आला.आता त्या अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचा एक अर्ज गायत्री राणे यांच्या विरोधात आहे.भाजपातर्फे वरिष्ठ पदावरील नेते,पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच पेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.महायुतीने ह्या निवडीतून विजयाचे खाते उघडल्याने भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
