Monday, March 2, 2026
Homeजळगांव शहरभारत विकास परिषदेतर्फे रविवारी केमिस्ट भवनात दिव्यांग महाशिबिराचे आयोजन.

भारत विकास परिषदेतर्फे रविवारी केमिस्ट भवनात दिव्यांग महाशिबिराचे आयोजन.

जळगाव – दि.(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) भारत विकास परिषद जळगाव शाखा व दिव्यांग केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग महाशिबिरात ५०० पेक्षा जास्त व्यक्तींच्या पायाचे,हाताची मोजणी होणार असून ४५ दिवसांनी त्यांना कृत्रिम मॉड्युलर हात,पाय ह्यांचे मोफत वितरण होणार आहे.त्यासाठी सीएसआर अंतर्गत पुणे येथील रॉकेट सॉफ्टवेअर यांच्याकडून आर्थिक सहकार्य लाभले आहे.रविवार १ मार्च रोजी सकाळी १० वाजता केमिस्ट भवन मध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ५२१ पेक्षा अधिक लोकांनी पूर्व नोंदणी केली आहे.त्यामुळे या शिबिराची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.या शिबिराचा ना.संजय सावकारे,खासदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल,उद्योजक अशोक जैन,महापौर दीपमाला काळे ,उपमहापौर मनोज चौधरी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक उज्वल चौधरी,केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे,अविनाश पाटील,रोटरी जळगाव मिडटाउनचे अध्यक्ष ॲड.किशोर पाटील, दिव्यांग केंद्र पुणेचे प्रमुख व विश्वस्त विनय खटावकर, रॉकेट सॉफ्टवेअरचे संचालक ललित माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.शिबिरातील लाभार्थींसाठी रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड आणि आकाशवाणी चौक येथून येण्या – जाण्याची व्यवस्था वाहनाद्वारे करण्यात आली आहे. लाभार्थी व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीसाठी चहा, नाश्ता व भोजनाची सुविधा मोफत उपलब्ध असणार आहे. या सामाजिक उपक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष हेमांगी महाजन,सचिव डॉ.अनुपम दंडगव्हाळ, कोषाध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने ,प्रकल्प प्रमुख तुषार तोतला,प्रकल्प समन्वयक चिन्मय खटावकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या