Thursday, April 2, 2026
Homeगौसेवाभव्य श्री गौकृपा कथेत धर्मसाथी गौ सेवा विशेषांकाचे पूज्य साध्वी कपिला दीदींच्या...

भव्य श्री गौकृपा कथेत धर्मसाथी गौ सेवा विशेषांकाचे पूज्य साध्वी कपिला दीदींच्या शुभ हस्ते प्रकाशन..सेवा कार्याची केली प्रशंसा..

जळगांव – दि.१४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) हरातील पांजरपोळ परिसरात दि.११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित भव्य श्री गौकृपा कथा कार्यक्रमात ४ थ्या दिवशी दि.१४ रोजी सायंकाळी धर्मसाथी गौ सेवा रंगीत विशेषांकाचे प्रकाशन या भव्य कथेच्या निरुपणकार पूज्य साध्वी कपिला गोपाल सरस्वती यांच्या शुभ हस्ते कथेच्या व्यासपीठावर करण्यात आले.या प्रसंगी व्यासपीठावर धर्मसाथीचे संपादक प्रसाद जोशी, प्रसिद्ध व्यावसायिक गो भक्त हरीष मुंदडा, पं .त्रिपाठी गुरुजी,यांची उपस्थिती होती.भव्य गौ कृपा कथेत आज ५६ भोग कार्यक्रमानंतर धर्मसाथी गौ सेवा विशेषांकाचे प्रकाशन करताना  साध्वी पूज्य कपिला दीदी यांनी या  सेवाभावी कार्याची प्रशंसा केली व सांगितले की धर्मसाथी गौ सेवा विशेषांकाच्या माध्यमातून गौ सेवा प्रचार प्रसार कार्यात प्रभावी योगदान दिले असून त्या मुळे गौ सेवेला प्रोत्साहन मिळाले आहे. व त्यातील अनेक लेख,साहित्य , गौ माते संदर्भात  नवीन व उपयुक्त माहिती समाजातील गो प्रेमींचा उत्साह वाढवत आहेत.याचा लाभ सर्व गो सेवेत आवड असलेल्या वाचकांनी घ्यावा व इतरांना ही यात सहभागी करावे.या प्रसंगी श्री पांजरपोळ संस्था विश्वस्त व सदस्य, भव्य गौकृपा कथा आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य ,जळगांव माहेश्वरी महिला मंडळ सदस्य ,विक्रमी रक्तदाता मुकुंद गोसावी,ब्रह्मश्री  संस्थेचे अध्यक्ष कमलाकर फडणीस,यांचेसह  गो प्रेमींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या