Tuesday, October 7, 2025
Homeजळगांव शहरब्राह्मण सभेतर्फे शैक्षणिक यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला गौरव..

ब्राह्मण सभेतर्फे शैक्षणिक यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला गौरव..

जळगांव : दि.२१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील शतकोत्तर वाटचालीची परंपरा असलेल्या ब्राह्मण सभेतर्फे महाराष्ट्रीयन ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शनिवार दि.२० रोजी दुपारी ४ वाजता ब्राह्मण सभेत मान्यवर अतिथीच्या उपस्थितीत मोठया उत्साहाने संपन्न झाला. ब्राह्मण सभेतर्फे दरवर्षी समाजातील विद्यार्थ्याना प्रोत्साहन मिळावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेतर्फे केले जाते.यावर्षी इ.१० वी,इ.१२ वी तसेच पदवीधर व उच्चशिक्षण घेऊन प्राविण्य मिळविलेल्या ६१ विद्यार्थी,विद्यार्थीनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावर्षी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून के.सी.ई. संस्थेच्या शैक्षणिक संचालिका डॉ.सौ.मृणालिनी फडणवीस तर विद्यार्थ्यांना करीअर संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक दिनेश देसाई यांची उपस्थिती लाभली होती.यावेळी दोन्ही वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्मण सभेच्या कार्यकारिणीतील ज्येष्ठ सदस्य उल्हास जोशी यांनी केले.यावेळी त्यांनी विद्यार्थी गुणगौरव समितीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.तसेच समाज बांधवांना विद्यार्थी गुणगौरवासाठी जास्तीत जास्त देणगी देण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.वैदेही नाखरे,उल्हास जोशी,हेमंत वैद्य,सौ.श्रध्दा कुळकर्णी यांनी केले.व्यासपीठावर डॉ.सौ. मृणालिनी फडणवीस,दिनेश देसाई,ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नितीन कुळकर्णी, कोषाध्यक्ष संदिप कुळकर्णी,चिटणीस जितेंद्र याज्ञिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोषाध्यक्ष संदिप कुळकर्णी, चिटणीस अॅड.अजय जोशी,चिटणीस जितेंद्र याज्ञिक, हेमंत वैद्य,राजेश कुळकर्णी,कमलाकर फडणीस,सौ. वैदेही नाखरे,सौ.श्रध्दा कुळकर्णी यांचेसह ब्राह्मण सभेचे व्यवस्थापक पी.आर.कुळकर्णी ,संजय खेडकर,प्रतिक लाळे तसेच कर्मचारी अभिमान तायडे यांचेसह अनेकांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या