जळगाव – दि.२३.(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) गेल्या सतरा वर्षांपासून ब्राह्मण हिता करीता विविध कार्यात अग्रेसर असलेल्या बहुभाषिक ब्राह्मण संघाच्याअध्यक्षपदी प्रतिथयश ॲड.ओम त्रिवेदी यांची निवड सर्वानुमते नुकतीच करण्यात आली.
रविवार दि. २२ फेबृवारी २०२६ रोजी लेवा भवन येथे संपन्न झालेल्या वार्षिक सभेत नूतन अध्यक्षपदी दोन वर्षांकरीता त्यांच्या नावाची घोषणा संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड व विद्यमान अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन पारगावकर यांनी केली.
विद्यमान अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन पारगावकर यांनी प्रास्ताविकात त्यांच्या अध्यक्ष पदाच्या २ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेऊन लक्षणीय कार्यात विद्यार्थी सहायता निधीतून झालेल्या एकूण कार्याची व सर्व तालुक्यांना भगवान परशुरामांची मुर्ती विना मुल्य दिल्याची माहिती दिली.
संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी येणाऱ्या वर्षातील एकूण उपक्रमांची माहिती दिली व भगवान श्री परशुराम जयंती निमित्त विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन पंकज पौनिकर यांनी केले तर आभार महेंद्र पुरोहित यांनी मानले.
ॲड ओम त्रिवेदी यांचा परिचय.
हे मूळचे एरंडोलचे असून २०१३ पासून जळगाव येथे कार्यरत आहेत. शिक्षण एस एस मणियार लॉ कॉलेजमधून घेतले असून विशेष भूसंपादन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र असून एकूण सात ठिकाणी कार्यालये आहेत. पत्नी रेखा यांनी एम ए गीता व्रती ही पदवी प्राप्त केली आहे. मुलगा आकाश आयआयटी कानपूर येथून शिकून आयआयएम अहमदाबाद करीता निवड झाली आहे. दुसरा मुलगा अभय नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्रिवेदी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी आहेत. तसेच एरंडोल धरणगाव येथे रोटरी क्लबचे कार्य विस्तारण्यात मोलाचं योगदान सुरुवाती पासून देत आहेत.
फोटो कॅप्शन:-ॲड. ओम त्रिवेदी यांचा सत्कार करतांना संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, माजी अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन पारगावकर समवेत योगेश व्यास, मनीष पात्रीकर, महेंद्र पुरोहित, परेश पाठक, पंकज पौनीकर समस्त पदाधिकारी.
