जळगाव – दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) बळीराम पेठेतील कै.महाराष्ट्र भूषण पु.ल.देशपांडे सार्वजनिक वाचनालयाच्या अभिनव अभ्यासिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४१ वी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला केशव स्मृती प्रतिष्ठानचे डॉ.विवेक जोशी व सुरेश अंभोरे यांच्या हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सावरकरांनी स्वातंत्र्य लढा व सामाजिक समते चे कार्याला देशात वाहून अस्पृश्य वंचित समाजासाठी केलेल्या कार्याचा स्मरण करण्यात आले.पारतंत्र्याच्या काळातील वंचित समाजाला मंदिर प्रवेश नाकारले जात असताना सावरकरांनी पतीत पावन मंदिर आंदोलन छेडले व वंचित समाजातील मांग,महार,मेहतर सह दलित,बहुजन समाजातील लोकांना जाहीररीत्या मंदिर प्रवेश मिळून दिले.हे देशातली अस्पृश्य समाजाची मंदिर प्रवेशाची पहिली घटना मानली जाते या घटनेनंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांचे केलेल्या कार्याबद्दल आभार मानून आनंद व्यक्त केला होता.अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष जितेंद्र बागरे यांनी दिली यावेळी मेहतर समाज पंचायत ज्येष्ठ सदस्य नरेश ढंडोरे रमेश घुसर मातंग समाजाचे अध्यक्ष सुरेश अंभोरे, अमोल गवळी,महेश पाटील,सोनु गवळी,अभिनव बागरे आदि.उपस्थीत होते.
बळीराम पेठेत महाराष्ट्र भूषण पू.ल. देशपांडे वाचनालया तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी..करण्यात आले अभिवादन..
RELATED ARTICLES
