Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरबळीराम पेठेतील रुद्र लाल हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव, महाप्रसाद कार्यक्रमाचे उद्या...

बळीराम पेठेतील रुद्र लाल हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव, महाप्रसाद कार्यक्रमाचे उद्या आयोजन..


जळगांव – दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील बळीराम पेठ परिसरात जागृतस्थान म्हणून ओळख असलेले श्री रुद्र लाल हनुमान मंदिरा तर्फे उद्या दि.२ रोजी श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले आहे.यात सकाळी श्रींचा जन्मोत्सव सकाळी शास्त्रोक्त पूजनाने होणार असून सकाळी ११ वाजता महाआरती कार्यक्रम भाविक भक्त व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.दुपारी १२ वाजता श्री रुद्र लाल मंदिर सेवा समिती तर्फे आयोजित महाप्रसाद कार्यक्रम प्रारंभ होणार असून १२ ते २ यावेळेत ही प्रसाद वितरण सेवा भाविक भक्तांना मिळणार आहे.तसेच भजनी मंडळ तर्फे रात्री भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता देवस्थानाचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या