जळगांव – दि.७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव शहर महापालिका निवडणूक प्रभाग ५ चे अपक्ष उमेदवार आश्विन सुरेश भोळे (निशाणी ट्रॅक्टर) यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज उत्साही वातावरणात दि ७ रोजी सकाळी बळीराम पेठेतील पत्र्या हनुमान मंदिर येथून झाला.सकाळी शनी मंदिर,बळीराम पेठ येथे सर्व कार्यकर्ते,मित्र परिवार एकत्र येवून ही प्रचार यात्रा काढण्यात आली.
पत्र्या हनुमान येथे श्रीफळ वाढवून साई बाबा मंदिर बळीराम पेठ,ब्राह्मण सभा परिसर,कारंजा चौक,शनी पेठ,पोलान पेठ,नवी पेठ अश्या विविध भागात ही प्रचार फेरी काढण्यात आली आहे.मतदारांचा प्रतिसाद फेरीला लाभत आहे.
प्रभागातील मतदारांना सामाजिक प्रश्नांची,समस्यांची जाण असलेला अभ्यासू असा हक्काचा,सेवाभावी उमेदवार निवडून द्या असे आवाहन कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.
प्रभाग ५ मधील अपक्ष उमेदवार आश्विन भोळेंच्या प्रचाराचा शुभारंभ..
RELATED ARTICLES
