जळगांव – दि.१२(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
प्रभाग-५ (ड) मधील अपक्ष उमेदवार आश्विन सुरेश भोळे यांनी प्रचारात आघाढी घेतली असून संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे.आज दि.१३ रोजी सकाळी ८ वा.प्रभागातील कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने भव्य अशी प्रचार रॅली बळीराम पेठेतील शनी मंदिरापासून निघणार आहे.
प्रभागात बऱ्याच काळापासून राहिलेला अपेक्षित विकास व्हावा.नागरिकांना,माता भगिनींना ,बालकांना ,युवकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळत नसल्याने ,तसेच प्रभाग हा मध्यवर्ती असून देखील त्यातील समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने पर्यायी निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करण्याचा मार्ग अवलंबला लागला असे मत त्यांनी निवडणूक लढवण्या संदर्भात व्यक्त केले.
निवडून आल्यास प्रभागातील स्वच्छ्ता ,आरोग्य ,सांडपाणी वाहून जाण्यासाठी चांगल्या गटारी,अधिक काळ टिकतील असे गुणवत्तेचे रस्ते,वेळेवर व नियमित पाणीपुरवठा ,सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व आवश्यक तेथे निर्मिती,उत्तम असे उद्यान,तात्काळ तक्रार निवारण यंत्रणा,सार्वजनिक वाचनालय,स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन वर्ग,अश्या अनेक बाबी साठी लक्ष घातले जाणार असल्याची माहिती धर्मसाथी लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली.
प्रभागातील अनेक विविध प्रकारच्या समस्या लवकर सोडवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू त्यासाठी प्रभागातील रहिवाश्यांनी संधी द्यावी त्याचे सोने करून दाखवील असा आत्मविश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.आज दि १३ रोजी सकाळी ८ वा. काढण्यात येणारी रॅली दीक्षित वाडी,तुकाराम वाडी,गणेश वाडी परिसरातून मार्गक्रमण करेल.
प्रभाग – ५ (ड) चे धडाडीचे अपक्ष उमेदवार आश्विन भोळेंच्या प्रचाराने घेतली आघाडी..आज दि.१३ रोजी भव्य प्रचार रलीचे आयोजन. .
RELATED ARTICLES
