Thursday, January 15, 2026
Homeजळगांव शहरप्रगतिशील महाराष्ट्र २०२५ च्या भव्य प्रदर्शन..केंद्र व राज्यातील योजना, उपक्रम माहिती जनतेपर्यंत..खा.स्मिताताईंची...

प्रगतिशील महाराष्ट्र २०२५ च्या भव्य प्रदर्शन..केंद्र व राज्यातील योजना, उपक्रम माहिती जनतेपर्यंत..खा.स्मिताताईंची संकल्पना..

जळगाव दि.३ – (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या संकल्पनेतून केंद्र व राज्य सरकारच्या योजना व उपक्रमांच्या प्रगतिशील महाराष्ट्र २०२५ भव्य प्रदर्शन आज दिनांक ३, ४ आणि ५ नोव्हेंबर २०२५ पासून शिवतीर्थ, (जी एस ग्राउंड) जळगाव येथे आयोजित करण्यात आले असून या भव्य प्रदर्शनीचे उद्घाटन उत्साहात मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.आज दिनांक 3 नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी १०:३० वाजता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन,जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे,राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे,खासदार अँड.उज्वल निकम,आ.अनिल पाटील,आ.सुरेश भोळे(राजू मामा),आ.मंगेश चव्हाण,आ.किशोर अप्पा पाटील,आ.अमोल पाटील ,आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे,आ.अमोल जावळे,आ. चंद्रकांत पाटील,भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी (पश्चिम)चंद्रकांत बाविस्कर(पुर्व),दिपक सूर्यवंशी (जिल्हा महानगर) तसेच पदाधिकारी व केंद्र/राज्य शासनाचे अधिकारी यांची उपस्थिती लाभणार होती.या भव्य प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती खासदार स्मिताताई वाघ यांच्या वतीने करण्यात आली असून या प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. विनामूल्य प्रवेश असुन या प्रदर्शनामध्ये ५४ विविध प्रकारचे शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात आलेले असून यामध्ये विज्ञान,तंत्रज्ञान ,वित्त,बँकिंग,विमा,आरोग्य कल्याण,कृषी,फलोत्पादन, हातमाग, हस्तकला,अंतराळ, विज्ञान, अणुऊर्जा, वाणिज्य, व्यापार,पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास, कृषी, पशुसंवर्धन, गृहनिर्माण व शहर विकास अशा विविध प्रकारच्या माहिती या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. तरी जळगाव जिल्हा लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या