Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरपोळा साजरा करताना बैलांचे आरोग्य चांगले राहील यादृष्टीने व्यवस्थापन करा.

पोळा साजरा करताना बैलांचे आरोग्य चांगले राहील यादृष्टीने व्यवस्थापन करा.

जळगाव – दि.२१(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) पिठोरी अमावस्येला पोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो. शेती व्यवस्थापनाते महत्त्वाची भूमिका असलेल्या बैलांप्रती आस्था आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना सण साजरा करा,परंतु वर्षभर बैलांचे आरोग्य चांगले राहील या दृष्टीने योग्य व्यवस्थापन करणे जरुरीचे आहे.असे मत पवन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात आले.पोळ्याच्या सणात बैलांना संपूर्ण विश्रांती देऊन त्यांची आंघोळ करून दुपारी शिंगे घासणे रंगविणे सजविले जातात.व संध्याकाळी पुरणपोळीचे जेवण सुद्धा त्यांना देतात तर या बाबी फक्त साजऱ्या करण्यासाठी नसून त्यात विशिष्ट महत्वाचा अर्थ भरलेला आहे कारण होळीच्या आदल्या दिवशी लोणी आणि हळदीच्या मिश्रणांनी तसेच पळस किंवा निंब या डहाडीने खांदा मळतात पेरणी किंवा शेत तयार करणे व इतर कामाच्या कामावरून खांद्यावर पडलेले भेगा मुलायम होतात काही जखमा असल्यास त्या बऱ्या होतात नंतर मशागतीने थकलेल्या बैलांना ठोंबरा देतात. यात विविध कडधान्य,भरड धान्य,गुळ,तेल अशा वस्तू असतात त्यामुळे बैलांना ऊर्जा व प्रतिनियुक्त तंतुमय आहार मिळतो.

आरोग्याबाबत व्यवस्थापन करणे..

पोळ्याच्या दिवशी उत्साह म्हणून सकाळी तलाव, ओढे किंवा नदीवर आल्यावर पहिल्यांदा आंघोळ घातली जाते. परंतु या गोष्टी करताना पुढील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे त्यात पुराचे पाणी गढूळ व दूषित असल्यामुळे पिण्यासाठी योग्य नसते त्यामुळे जनावरांना ते देऊ नये,सध्या भरपूर प्रमाणात पाऊस असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आहे त्यामुळे पहिल्यांदा आंघोळ घालताना काळजी घ्यावी,खोल पाण्यात किंवा चिखलात जाऊ नये वेळ प्रसंगी सोबतच्या व्यक्तीचा सुद्धा मृत्यू होऊ शकतो,शिंगे घासताना त्यांना जखमा होणार नाहीत,रक्तस्त्राव होणार नाही याची काळजी घ्यावी,लंपी,खुरखूत सारख्या संसर्गजन्य रोगामुळे आपल्या परिसरात अशा जनावरांपासून आपली जनावर दूर ठेवावी,सध्या वातावरणात कीटकांचे प्रमाण जास्त आहे.ते चाऱ्यावरती बसलेले असतात तो चारा तसाच पोटात जातो त्यामुळे हिरवा चारा खाताना जनावरांना हगवण लागते.त्यांच्या पोटात ती किडे जाऊ शकतात तर पोटाचे विकार होऊ नये म्हणून हिरवा चारा व खुराक समतोल प्रमाणात द्या,नाकात नाथन टोचताना नाकाचाभाग नाजूक असतो त्यामुळे रक्तस्राव होऊ नये याची काळजी घ्या,झुला मखर व इतर गोष्टीने सजवताना डोळे झाकले जाणार नाही व अवयवांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या,पोळा सुटताना बहुतेक ठिकाणी शर्यती लागतात बैल पळवताना बैलांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी संध्या काळी पुरणपोळ्या भरपूर प्रमाणात खाऊ घालू नये कारण तो त्यांचा आहार नाही शिजवलेले अन्न देण्याची गरज नाही त्यांना तंतुमय पदार्थ लागतात,पावसामुळे जनावरांचे गोठे कोरडे व हवेशीर ठेवावे त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते.अशाप्रकारे पवन चारिटेबल ट्रस्ट यांनी पोळा या सणात कृतज्ञता व्यक्त करताना बैल ,गाई ,म्हशी व इतर गुरेढोरे यांचे आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करण्यावर भर द्यावा अशी मागणी पवन ट्रस्टचे विलास नारखेडे,शेतकरी गोविंद भोळे,रघुनाथ राणे,सोमा तायडे,दगडू पाटील,राहुल खडके,लोकेश राणे,पवन नारखेडे इत्यादींनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या