जळगांव – दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महाराष्ट्र राज्यातील पोलिस अधीक्षक यांच्या बदल्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने,पोलिस सेवा अधि.नुसार प्रशासकीय कारणास्तव,राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे. शासनाच्या आदेशाने जळगावात दोन नवीन अधिकारी तर पदोन्नतीने १ असे तीन अधिकारी जिल्ह्यात येणार आहेत.
राज्य शासनाने पोलीस उपअधीक्षक/ सहा.पोलीस आयुक्त या संवर्गातील ३५ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी जारी केले. त्यात जळगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर मालेगाव येथील नितीन गणापुरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या बदल्या, जळगाव जिल्ह्यात ३ नवे अधिकारी येणार..
RELATED ARTICLES
