जळगांव- दि.४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांना आज दि.४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव येथील ब्रह्मश्री बहु उद्देशीय संस्थे तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
गेल्या कित्येक वर्षात अश्या कल्याणकारी योजना ब्राह्मण समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकास करण्याकामी नव्हती त्यामुळे अनेक कुटुंबांचा विकास मोठ्या प्रमाणावर होत नव्हता आता तो विकास या उपलब्धते मुळे साधता येईल.
या शासनाने लक्ष घालून आम्ही समस्त जळगाव जिल्ह्यातील विविध ब्राह्मण समाज संघटनेच्या विविध आंदोलनातून पाठपुरावा केलेल्या मागण्यांचा विचार करून आम्हाला न्याय मिळवून दिला त्यासाठी शासनाचे आभार मानणे आमचे कर्तव्य आहे.यापुढेही आमचे उर्वरित मागण्या साठी संघटन कार्य सुरूच राहील असे मत ब्रह्मश्री संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ यांनी व्यक्त केले.
परशुराम आर्थिक विकास महामंडळ कल्याणकारी योजनांना मंजुरी..ब्रह्मश्री संस्थेने शासनाचे मानले आभार.
RELATED ARTICLES
