Tuesday, October 7, 2025
Homeजळगाव ग्रामीणनांद्रा - रीधुर रस्त्यावरील पूल ग्रामस्थांसाठी 'नवसंजीवनी'- पालकमंत्री गुलाबराव पाटील.. विदगाव...

नांद्रा – रीधुर रस्त्यावरील पूल ग्रामस्थांसाठी ‘नवसंजीवनी’- पालकमंत्री गुलाबराव पाटील.. विदगाव परिसरात ७५० महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते भांडे संच वाटप…

विदगाव / जळगाव (प्रतिनिधी) दि. ५ जुलै – रिधुर-नांद्रा-चांदसर-कवठळ परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. अनेक वर्षांपासून या परिसरातील ग्रामस्थ पूल उभारणीची मागणी करीत होते.अखेर शासनाच्या अर्थसंकल्पातून ₹ २ कोटी ९ लाखांचा निधी मंजूर करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले.गावकऱ्यांची वर्षानुवर्षांची मागणी आज पूर्ण झाली असून नवीन पुलामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे पावसाळ्यातील हाल कायमस्वरूपी दूर होतील. हा पूल केवळ दळणवळणाचे साधन नसून ग्रामस्थांसाठी एक ‘नवसंजीवनी’आहे.भांडे संच ही कामगार महिलांसाठी केवळ मदत नाही,तर त्यांच्या कष्टांना दिलेला सन्मान असल्याचे भावनिक प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विदगाव येथे पूल लोकार्पण व भांडे वाटप संच प्रसंगी केले. विदगाव येथे महिलांना भांडे संच वाटप

विदगाव परिसरातील ७५० कामगार महिलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भांडे संच वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, “हा भांडे संच केवळ मदत नाही, तर महिलांच्या कष्टाला दिलेला सन्मान आहे.” या उपक्रमाबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समितीच्या माजी सभापती ललिताताई जनाआप्पा कोळी यांनी केले. सूत्रसंचालन राजू कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जनाआप्पा कोळी यांनी केले.              यांची होती उपस्थिती

या दोन्ही कार्यक्रमांना तालुकाप्रमुख शिवराज पाटील, सभापतीपती जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील,तुषार महाजन,जितू पाटील,सरपंच चुडामन कोळी,उपसरपंच राजू कोळी,महेंद्र कोळी,मुरलीधर कोळी,ज्ञानेश्वर कोळी,निलेश कोळी,गजानन सोनवणे, शालिक पाटील,सुनील पाटील,देवेंद्र कोळी,भगवान कुंभार,बळीराम कोळी यांच्यासह विदगाव, नांद्रा,रिधुर, कानळदा परिसरातील  शेतकरी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या