Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरनवी पेठेत ललवाणी परिवारातर्फे होणार वहनाचे भव्य स्वागत..पान सुपारीच्या कार्यक्रमाचे आयोजन..

नवी पेठेत ललवाणी परिवारातर्फे होणार वहनाचे भव्य स्वागत..पान सुपारीच्या कार्यक्रमाचे आयोजन..

जळगांव – दि.२४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील नवी पेठ परिसरात श्रीराम मंदिर देवस्थान संचलित वहन उत्सवात आज दि.२४ ऑक्टोंबर शुक्रवार रोजी पराक्रमाचे प्रतिक असलेल्या वाघाचे वहनाचे आगमन प्रसिद्ध सुवर्ण अलंकार निर्माते व विक्रेते मे. रूपचंद शांतीलाल या पेढीचे संचालक निलेश ललवाणी यांच्या कार्यालयात होत आहे.ललवाणी परीवारा तर्फे या वहनाचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती ह.भ.प.श्री मंगेश महाराज , श्रीराम महाराज ,यांच्या उपस्थितीत पान सुपारीच्या कार्यक्रमाचे आयोजन रात्री ८.३० वाजता करण्यात आले आहे.नवी पेठ परिसरातील भारत डेअरी गल्लीत शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वहनाचे प्रथमच आगमन होत असल्याने परिसरातील रहिवासी व व्यावसायिक यांना वहन दर्शन व आरती पूजनाचा ,प्रसादाचा लाभ होणार आहे.परिसरात वहनाच्या स्वागता साठी सडे,रांगोळ्या ,रोषणाई करून सजावट केली जाणार आहे.तरी शहरवासीयांनी तसेच नवी पेठ परिसरातील रहिवासी ,व्यापारी बांधवांनी,सार्वजनिक मंडळांनी या वहन उत्सवात सहभागी होवून धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला जतन करावे असे आवाहन ललवाणी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या