जळगाव दि.२७(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिवहन संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच-19 /ईआर ०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे.दिनांक २८ व २९ मे २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दिनांक २९ मे २०२५ रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. दिनांक २९ मे रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत कार्यालयात एका क्रमांकसाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास एका पेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत ३० मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
बंद लिफाफे हे 30 मे रोजी 4.30 वाजता सहाय्यक /उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या समक्ष उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश संबंधितांना परत करण्यात येतील असे जळगावचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
दुचाकी वाहन.. नविन नोंदणी क्रमांकाच्या मालिकेस ०२ जून पासून सुरुवात..आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकांसाठी ..२८ व २९ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..
RELATED ARTICLES