जळगांव : दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव जिल्हा ग्राहक पंचायत चे सदस्य व ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य डॉ. अविनाश सोनगीरकर यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक विभागातून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तळोदा येथे नुकतेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र तळोदा शाखे तर्फे एकदिवसाचा अभ्यास वर्ग पार पडला. यात नाशिक विभागाचे १३० सदस्य उपस्थित होते. ग्राहक पंचायतचे राज्य अध्यक्ष विजय लाड हे अध्यक्ष स्थानी होते.
आमदार राजेश पाडवी यांनी उदघाटन केले.प्रमुख अतिथी म्हणून माजी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी,राज्य सचिव अरुण वाघमारे,विभागीय अध्यक्ष डॉ.अजय सोनवणे,विभागीय सचिव अडव्होकेट सुरेंद्र सोनवणे,विभागीय उपाध्यक्ष रणजित सिंह गौड,पोलीस निरीक्षक राजेद्र लोखंडे,विभागीय संघटक संजय शुक्ला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अनेक वर्षा पासून जनसेवेचे व्रत स्वीकारणाऱ्या साधकांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात डॉ.अविनाश सोनगीरकर हे अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या समास्या सोडवन्यात यांच्ये मोठे योगदान आहे. त्यांना न्याय देण्याचे सामाजिक कार्य करत असलेल्या सेवेची दखल घेत नाशिक विभागाने जीवन गौरव पुरस्कार राज्य अध्यक्ष श्री विजय लाड यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांचे विविध संस्था मित्र परिवारांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
डॉ अविनाश सोनगीरकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित..
RELATED ARTICLES
