जळगाव – दि.४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत शंकरराव काळुंखे वय वर्ष ७१ यांचे दिनांक ३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून २४ मिनिटांनी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
जळगाव शहरातील विविध दैनिकात त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीतून विविधांगी लेखनातून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते.विविध सदरातून नावीन्य पूर्ण मांडणी,प्रभावी मुलाखती तसेच चित्रपट समीक्षण लिहण्यात त्यांचा हातखंडा होता.उत्कृष्ट लेख, वाचनीय सदर,असलेला दिवाळी अंक देखील ते दरवर्षी प्रकाशित करत असत.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा.राहत्या घरून खेडी शिवार पत्रकार कॉलनी जळगाव येथून नेरी नाका स्मशान भूमी जळगाव येथे निघणार आहे त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले सुना नातवंडे असा परिवार असून ते रेशन दुकानदार श्री हेमरत्न( चिकूभाऊ ) व मकरंद काळुंखे यांचे वडील होते.