Tuesday, October 7, 2025
Homeजळगांव शहरज्येष्ठ पत्रकार स्व.हेमंत काळुंखेनां करुणा त्रिपदी परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण..

ज्येष्ठ पत्रकार स्व.हेमंत काळुंखेनां करुणा त्रिपदी परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण..

जळगांव – दि.१४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जेष्ठ पत्रकार,सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते,करुणा त्रिपदी परिवारात सेवाभावी योगदान देणारे स्व.हेमंत काळुंखेनां आज दि.१४ रोजी सायंकाळी बळीराम पेठेतील स्वामी चिदानंद सभागृहात त्रिपदी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी त्यांच्या जीवन कार्यातील अनंत आठवणींना व त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंना उपस्थितांनी आपल्या श्रद्धांजली पर मनोगतात उजाळा दिला.त्रिपदी परिवारात त्यांनी केलेल्या सेवाभावी कार्याचा उल्लेख करीत त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असल्याचे मत राजेंद्र कुळकर्णी यांनी मांडले.अनिल तारे यांनी त्यांच्या निस्वार्थी सेवेतून त्रिपदी परिवारात अमूल्य योगदान दिले असल्याने अनेक आठवणी मांडत त्यांच्या सारख्या सेवाभावी कार्य तत्पर साधकाला हा परिवार कधीही विसरू शकणार नाही आदरणीय बाबासाहेब यांनी देखील त्यांच्या कार्याची प्रशंसा व गौरव केला आहे.अशी भावना आपल्या मनोगतात व्यक्त केली.,धर्मसाथी व श्री गुरुदत्त भक्ती प्रसाद धाम,नवीपेठ परिवारा तर्फे प्रसाद जोशी यांनी त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील सहवासातील अनेक आठवणीना मांडत श्रद्धांजली अर्पण करीत त्यांच्या कार्याचे स्मरण केले.त्यांच्या परिवारातर्फे त्यांचे पुत्र हेमरत्न,पुतणे योगेंद्र ,धीरज काळुंखे यांचेसह भुसावळ त्रिपदी परिवाराचे सुधीर देशपांडे,अजय जोशी,किशोर जोशी,श्री सदिस्तभ,जळगांव पदिवाराचे प्रदिप सोनवणे,किशोर सोनवणे,बापू नेवे,बाबा नेवे,विलास नेवे,असे अनेक सदस्य उपस्थित होते.शेवटी शांती मंत्राने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या