Monday, July 7, 2025
Homeजळगाव ग्रामीणजि.प.शाळा विदगाव येथे शालेय विद्यार्थ्याना वह्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण..

जि.प.शाळा विदगाव येथे शालेय विद्यार्थ्याना वह्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण..

विदगाव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) विदगाव जि.प.शाळेत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सालाबादप्रमाणे ग्रामीण शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी वह्या पाठवल्या होत्या.वही वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.मान्यवर प्रमुख अतिथिंच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.याप्रसंगी प्रमुख मान्यवर जनार्दन आप्पा सपकाळे माजी.प.सभापती जळगाव.विदगाव सरपंच.कैलास जळके,ग्रा.प.सदस्य नाना कोळी,ग्रा.प.सदस्य,महेंद्र कोळी,ग्रामपंचायत सदस्य.मुरलीधर कोळी,ग्रामपंचायत सदस्या.सरिता कोळी,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष.योगेश सपकाळे,तसेच ग्रामस्थ,निलेश सपकाळे.बाळकृष्ण कोळी,समाधान श्रीराम कोळी,सूर्यभान कोळी यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या.त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचा वातावरण पाहवयास मिळत होते.शेवटी या कार्यक्रमाचे निलेश काळे सर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या