Tuesday, October 7, 2025
Homeजळगांव शहरजिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ.रवींद्र ठाकूर रुजू.

जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ.रवींद्र ठाकूर रुजू.

जळगाव- दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगाव जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ रवींद्र ठाकूर त्यांनी आज पदभार स्वीकारला.यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.डॉ ठाकूर यांनी यापूर्वी सहायक संचालक म्हणून मंत्रालय, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक, छत्रपती संभाजी नगर तर अहिल्यानगर व पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे.डॉ.ठाकूर हे मूळचे जळगाव येथील असून, त्यांनी शासकीय सेवेत येण्या अगोदर, दैनिक जनशक्ती, दैनिक देशदूत या वृत्तपत्रांमध्ये तसेच मु. जे. महाविद्यालयात संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग प्राध्यापक म्हणून काम केले आहे.जिल्हा माहिती कार्यालय हे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना,उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी महत्वाचा दुवा मानले जाते,शासनाची ध्येयधोरणे आणि जनहिताच्या शासकीय योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन,असे डॉ.ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या