Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरजागतिक छायाचित्रण दिनानिमित्त जळगावात कॅमेरा पूजन..

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त जळगावात कॅमेरा पूजन..

जळगाव, दि. १९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून प्रेस फोटोग्राफर असोसिएशन जळगाव, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृहात १८४ वा छायाचित्रण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कॅमेरा पूजनासह मान्यवरांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला, ज्यात फोटोग्राफीच्या सामाजिक व कलात्मक महत्वावर प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.प्रास्ताविकात असोसिएशनचे शब्बीर सय्यद यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे तसेच गोदावरी फाउंडेशन चे सहकार्य लाभत असते. ते म्हणाले,”हे प्रेस फोटोग्राफर असोसिएशन संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने आर्ट गॅलरीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी मनोगतात असोसिएशनला स्वतंत्र जागेची आवश्यकता अधोरेखित केली, “या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू, किमान पुढचा जागतिक छायाचित्रण दिवस त्यांच्या स्वतःच्या वास्तुत होऊ शकेल असा निश्चय सर्वांनी मिळून करूया…” असे सांगितले.

डॉ. केतकी पाटील मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, “छायाचित्रण केवळ जीवनाचे क्षण टिपत नाही, तर आठवणी आणि भावनांना चिरतरुण ठेवते. ते जीवनातील मौल्यवान क्षणांना अमर करते.” जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी वैयक्तिक अनुभव सांगत छंद जोपासण्याचे महत्व पटवून दिले. “पूर्वी वृत्तपत्रात छायाचित्र छापून येणे ही मोठी गोष्ट होती आजही आहे. माझ्या मुलाला फोटोग्राफीचा छंद आहे, त्याला मी कॅमेरा उपलब्ध करून दिला, तो त्याचा छंद उत्तम प्रकारे जोपासत आहे. कोणताही एखादा चांगला छंद जीवनाला सरस बनवत असतो,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी उज्वला बेंडाळे, फारुख शेख आणि अरविंद देशपांडे यांनीही आपले विचार मांडले.

व्यासपीठावर सौ. सीमा भोळे, सरिता माळी-कोल्हे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश जगताप यांनी केले. काय॔क्रमा साठी वैभव धर्माधिकारी, अतुल वडनेरे,शैलेश पाटील, जयंत चौधरी, दिलीप कोळी,अरूण,राजा सैय्यद, आदिती मेहनत घेतली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या