जळगाव- दि.२७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जिल्ह्यातील संगणक ,सीसीटीव्ही विक्रेते ,फेरविक्रेते,घाऊक विक्रेते,वितरक आणि सेवा संस्था आदीच्या विकासा साठी निर्माण झालेल्या JDCDA अर्थात् जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डीलर्स असोसिएशन,जळगाव तर्फे हिवाळी क्रिकेट स्पर्धा शनिवार,दिनांक ३१ जानेवारी आणि रविवार,१ फेब्रुवारी २०२६ रोजी एकलव्य क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे.या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळीच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक प्रामा इंडिया हे आहेत.या सोबतच इपसन प्रिंटर, लिनिहो लॅपटॉप ,Npav अँटीव्हायरस, Zebronics Peripheral ,Evteq Security CCTV, Brother Printer, सर्वज्ञा Computer आदी कंपन्यांचे संघ या क्रीडा कुंभामध्ये सामील होणार आहे.
आठ संघांमध्ये सामने झाल्यानंतर उपांत्य फेरीचे सामने होतील आणि त्यानंतर अंतिम सामना होईल.स्पर्धे मध्ये सर्वोतम फलंदाज,गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी वैयक्तिक बक्षिसे असतील.उत्तम संघ,उपविजेता आणि विजेता संघ अशी सांधिक बक्षिसे असतील,यानिमित्ताने खेळाडू म्हणून आलेले व्यावसायिक, वर्षभर आपापसा तील व्यावसायिक संबंध आणि पारदर्शिक व्यवसाय करण्यास एकमेकाला मदत करतात. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ४०० सदस्य माहिती देवाण-घेवाण करतात.
या क्रीडा स्पर्धाच्या निमिताने सर्व कंपन्यांचे उपकरणांची उजळणी .विविध कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी आणि जळगाव जिल्ह्यातील छोटे-मोठे संगणक विक्री व्यावसायिक यांची भेट, तसेच व्यवसायातील अडीअडचणी,विक्री वाढवण्या साठीचे प्रयत्न,दरामधली तफावत,उपकरणांची वैशिष्ट्ये,विक्री पश्चात सेवेतील त्रुटी आदींची या निमित्ताने चर्चा होते.तसेच शरीरची सुदृढता ,चपळता आणि आरोग्य उत्तम राखण्यासाठी खेळ किती महत्त्वाचा आहे हे ही सर्व उपस्थितांवरती ठसविण्यात येते.
दरम्यान सर्व कंपनीच्या विक्री व सेवा प्रतिनिधी आणि असोसिएशनच्या सदस्यांची विविध कंपन्यांच्या प्रतिनिधी सोबत २९ तारखेला संध्याकाळी बी टू बी प्रकाराची सभा घेण्यात येणार आहे.या सभेला साधरण २०० जणांची उपस्थिती लाभणार आहे.
अग्रगण्य कंपन्यांचे प्रमुख यांचे उपस्थितीमध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता तर समारोप १ फेब्रुवारी रोजी अंतिम सामन्यानंतर संध्याकाळी ६ वाजता करण्यात येईल.मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम नंतर स्पर्धेचा समारोप होईल.
जेडीसीडीए या संस्थेचे अध्यक्ष अनिल शिरसाळे, उपाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे,खजिनदार तुषार चौधरी, पदाधिकारी सचिन दुनाखे,योगेश चौधरी, शरद चव्हाण,श्याम सोनवणे हे नियोजनाचे व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.यावर्षीच्या क्रिकेट कमिटीचे चेअरमन प्रीतम लाठी आणि प्रचार प्रसार समिती पंकज पवनीकर यांनी वरील माहिती दिली आहे.
