Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरजळगावातील नवीपेठ गणेश मंडळ व युवागर्जना फाउंडेशन तर्फे युवा हंडीचे शनिवारी उत्साही...

जळगावातील नवीपेठ गणेश मंडळ व युवागर्जना फाउंडेशन तर्फे युवा हंडीचे शनिवारी उत्साही आयोजन..ढोल ताशा १२० वादकांचे पथक,लेझर लाईट शोचे आकर्षण..

जळगाव- दि.१५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) नवीपेठ गणेश मंडळ व युवागर्जना फाउंडेशन तर्फे युवा हंडीचे उत्स्फूर्त आयोजन शनिवार दि.१६ ऑगस्ट रोजी ६ ते ९:३० या वेळेत करण्यात आले आहे.युवा हंडीचे हे उत्साही आयोजन जळगाव करांच्या  आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होत असतात. जळगांव शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील एक सुसंस्कृत आणि वैचारिक प्रगल्भता असलेले संस्कृती जपणारे गणेश मंडळ म्हणून ख्याती असणाऱ्या,नवीपेठ गणेश मंडळाचे यंदा दही हंडी चे २६ वे वर्ष आहे.या युवा हंडी मध्ये युवागर्जना ढोल ताशा पथकाचे १२० वादक पुर्ण जोशात सहभागी होतील आणि दही हंडीची शान वाढवतील.व समवेत अनेक संस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत आणि लेझर लाइट्सची कमाल देखील पहावयास मिळणार आहे.तरी सर्व जळगावकरांनी या उत्साही आयोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा गर्जना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मधूर झवर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या