जळगांव – दि.४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव शहरात मुख्यमंत्री ना.देवेन्द्र फडणवीस यांच्या भव्य रोड शो चे आयोजन दि.०६ जानेवारी रोजी मंगळवारी करण्यात आले आहे.महायुती कार्यकर्त्यांत त्या मुळे उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
जळगाव शहर महापालिका निवडणुकीत महायुती उमेदवारांना मार्गदर्शन देण्यासाठी दुपारी ३.०० वाजता या भव्य रोड शोचा प्रारंभ जिल्ह्यातील,नेते ,पदाधिकारी,उमेदवारांच्या,उपस्थितीत होईल.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरवात होवून नेहरू चौक,घाणेकर चौक,सुभाष चौक,चित्रा चौक,गोलाणी मार्केट,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप होईल व यानंतर लगेच त्याच ठिकाणी मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकार बांधवाशी संवाद साधणार आहेत.अशी माहिती मनोज भांडारकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाजप जिल्हा महानगर यांनी दिली आहे.
जळगांव शहरात मुख्यमंत्री ना.देवेन्द्र फडणवीस यांचा दि.६ रोजी रोड शो…भव्य आयोजन..
RELATED ARTICLES
