जळगाव – दि.१८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील नागरिकांसाठी अयोध्या-काशी यात्रेचे मोफत रेल्वे प्रवासाचे आयोजन जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे(राजू मामा)यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.या विशेष यात्रेची सुरुवात जळगाव येथून दिनांक १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० वाजता रेल्वे स्थानकावरून जय श्रीराम हर हर महादेवाचा जयघोष करत २ हजार भाविक अयोध्यासाठी प्रस्थान झाले.
यावेळी रेल्वेला झेंडा ना.गिरीश महाजन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ना.रक्षा खडसे खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी,ग्रामीण अध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी यांनी झेंडा दाखवून भाविकांना शुभेच्छा देत रवाना केले.
ही धार्मिक यात्रा भाविकांसाठी एक अध्यात्मिक अनुभव ठरणार असून,सर्वांच्या सहकार्याने ती यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी केला विशेष म्हणजे स्वतः आमदार सुरेश भोळे माजी महापौर सीमाताई भोळे हे स्वतः कार्यकर्त्यां बरोबर व भाविकांबरोबर रेल्वे गाडीमध्ये उपस्थित होते.यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय श्रीरामचा जयघोष करून अयोध्या स्पेशल रेल्वे गाडीला दाखवला मंत्री ना. गिरीश महाजन,ना रक्षाताई खडसे यांनी झेंडा दाखवून केली गाडी रवाना..आ. सुरेश भोळे (राजुमामा) घडवताय २ हजार भाविकांना अयोध्या काशी दर्शन..
RELATED ARTICLES
