चाळीसगाव – दि.२३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील श्री आनंदा माता देवस्थान हे एक जागृत देवस्थान असून ती चाळीसगावची ग्रामदेवता आहे.पुरातन काळापासून हे स्थान अस्तित्वात आहे.भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करून नवसाला पावणारे स्थान म्हणून याची ख्याती आहे.
भाविकांना कृपा करीत आशिर्वाद देणारी श्रीआनंदा मातेची विलोभनीय मूर्तीचे स्वरूप आकर्षणाचा केंद्रंबिंदू आहे. नवरात्र उत्सव मोठ्या स्वरूपात या देवस्थानात साजरा केला जातो.तालुक्यासह जिल्ह्यातून भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येतात.
देवी गल्लीतील शुक्ल परिवार देवीच्या मंदिराची देखभाल व पूजेची जबाबदारी गेल्या चार पिढ्यांपासून संभाळत आहे.नवरात्रात देवीचे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते तसेच चाळीसगाव येथील नामांकित बँड पथक आरतीच्या वेळेस येत असते. नवरात्रात नऊ दिवस शुक्ल परिवारातर्फे आनंदा मातेस पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो.