Tuesday, October 7, 2025
Homeजळगांव शहरके. सी. ई. शिक्षण संस्थेची ८१ वर्षाची दैदिप्यमान वाटचाल.. वर्धापन दिना...

के. सी. ई. शिक्षण संस्थेची ८१ वर्षाची दैदिप्यमान वाटचाल.. वर्धापन दिना निमित्त दि.१६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन.. पत्र परिषदेत माहिती..

जळगाव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) के. सी. ई. संस्थेच्या प्रगतिशील क्षेक्षणीक वाटचालीचा  ८१ वर्षाचा प्रवास पूर्ण झाल्याने त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे मान्यवर अतिथी यांच्या उपस्थितीत संस्थेच्या वतीने आयोजन दि.१६ सप्टेंबर रोजी करण्यात आल्याची माहिती आज दि.१३ रोजी मु.जे. महाविद्यालयात आयोजितपत्र परिषदेत देण्यात आली.खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९४४ मध्ये झाली.सुरवातीला विद्या प्रसारक संस्थेच्या वास्तुत १९४४ ते १९४९ पर्यंत होती. त्यानंतर दानशूर मूळजी जेठा यांनी दिलेल्या जागेत संस्था उभी राहिली. सर्वांना शिक्षण देण्याच्या उद्देशानं “ज्ञान प्रसारो व्रतम” या ब्रीद वाक्याने शिक्षण प्रसारण करण्यास वचनबद्ध असलेली एक संस्था म्हणून जळगाव (महाराष्ट्र) येथे या संस्थेची स्थापना झाली.मागील पाच वर्षात आयएमआर ,इंजिनीअरिंग, मुलांचे वसतिगृह ,लाँ कॉलेज,आणि सुसज्ज ५०० प्रेक्षक क्षमता असलेले नाट्यगृह अशी विशेष कामगिरी झाली आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२०नुसार, केसीई सोसायटी आता अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार आणि योग विज्ञान यांसारख्या विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे. हा प्रवास आता ८१ वर्षांचा झाला. त्या निम्मताने दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता, केसीई संस्थेच्या प्रांगणात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचे योजिले आहे.असे प्रथमच होत आहे कि केसीई च्या सर्व संस्था मिळून एकाच दिवशी एकच वेळेस त्यांची आत्तापर्यंतची सुरु असलेली वाटचाल विविध अंगाने मांडत आहेत.या कार्यक्रमात एकूण १७ कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमासाठी क.ब.चौ.उ.म.वि.चे मा.कुलगुरू विजय माहेश्वरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. विशेष अतिथी म्हणून मा.उप कुलगुरू एस.टी.इंगळे उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या कार्याचा आणि वाटचालीचा परिचय देणारी चित्रफीत सादर करण्यात येणार असून त्याच्यातून संस्थेच्या गौरवशाली इतिहासाची झलक बघायला मिळणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष अँड़.श्री. प्रकाश पाटील भूषवणार आहेत.याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष अँड़.श्री.प्रकाश पाटील ,डी.टी.पाटील, प्रा.मृणालिनी फडणवीस,शशिकांत वडोदकर, आणि प्राचार्य संजय भारंबे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या