Tuesday, October 7, 2025
Homeआध्यत्मिकओंकारेश्वर मंदिरात आज सकाळी ९ वा. सिद्धयोग प्रचार प्रसार कार्यक्रम..प. पू.श्री.प्रभुणे महाराज...

ओंकारेश्वर मंदिरात आज सकाळी ९ वा. सिद्धयोग प्रचार प्रसार कार्यक्रम..प. पू.श्री.प्रभुणे महाराज यांचे विशेष मार्गदर्शन..

जळगांव – दि.२३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट – मुख्य केंद्र (नाशिक) येथून प्रमुख विश्वस्त प.पू.श्री प्रकाशराव प्रभुणे महाराज यांचे जळगावात सिद्धयोग प्रचार प्रसार कार्यक्रमा निमित्त आगमन झाले.दि.२३ जुलै बुधवारी सायंकाळी ६ वाजता महाराजांचे जळगाव केंद्रावर आगमन झाल्यावर त्यांचे भक्त परिवारातर्फे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी त्यांचे औक्षण करण्यात आले. संध्याकाळी सामूहिक साधना,आरती झाल्यानंतर महाराजांचे दर्शनाचा लाभ सर्व साधकांनी घेतला.महाराजांनी साधकांशी हितगुज केले.या प्रसंगी सर्व साधकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आज ओंकारेश्वर मंदिरात प्रचार प्रसार कार्यक्रम

आज दिनांक २४ जुलै रोजी श्री ओंकारेश्वर मंदिर जळगाव येथे सकाळी ९ वाजता सिद्धयोग प्रचार – प्रसार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे
सर्वांनी त्यात सहभागी होवून प.पू.श्री.प्रभुणे महाराजांच्या भेटीचा व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव सिद्धयोग साधना केंद्राचे वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या