जळगांव-दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
ऑर्किड नेचर फाऊंडेशनची दि.१२ व १३ जुलै रोजी दोन दिवसीय गॉड ग्रीन ट्रीप उत्साहात संपन्न झाली. १२ जुलै रोजी मेहुण येथील संत मुक्ताई, तापी पूर्णा संगमावरील श्री संत चांगदेव मंदिर,श्रावण बाळाचा ज्या रामायणात उल्लेख आला आहे ते स्थान हरताळा तलाव,नागझरी,शेगाव येथील श्री.गजानन महाराज देवस्थान यांना भेट देऊन दर्शन घेतले.
संध्याकाळी शेगाव येथील पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचं कार्य करणारी गो-ग्रीन संस्थेने संवर्धीत केलेल्या आठव्या’ओमकार वनास’भेट दिली.तिथे गो- ग्रीन संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल मिरगे,प्रशांत खत्री,प्रसिद्धी प्रमुख दिलिपजी इंगळे,प्रल्हाद साबे,भेरूलालजी राठी,प्रमोद इंगळे,एकनाथ भिसे,आनंद बरनेला, धम्माल आंग्रे हे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
गो-ग्रीन संस्थेच्या सदस्यांनी मिळून शेगावच्या पावन भूमीत निसर्ग संवर्धनासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवीले आहेत.कमी जागेत जास्तीत जास्त भारतीय प्रजातीची वृक्ष लागवड करून लोकसहभागातून आणि श्रमदानातून विविध ठिकाणी एकूण आठ वने उभारली आहेत.त्यापैकी एक असलेल्या’ओमकार वनास’भेट देऊन लावलेल्या वृक्षांची पहाणी केली.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन गो- ग्रीन संस्थेस “पर्यावरण मित्र”सन्मानपत्र देऊन अध्यक्ष आर.एन. कुलकर्णी यांच्या हस्ते सर्व सदस्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने सन्मानित श्री. विठ्ठल मिरगे सरांनी त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली.तसेच आमच्या ऑर्किड नेचर फाऊंडेशनचाही सन्मान पत्र देऊन गौरव केला.दि.१३ जुलै रोजी वारी हनुमान आणि कारंजा लाड येथील दत्तगुरूंच्या गुरूमाई मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले..वान नदीवरील महाकाय अशा हनुमान वान प्रकल्प भेट देण्यात आली..ह्याच धरणातून संपूर्ण शेगाव आणि आजुबाजूच्या तालुक्यांना पाणीपुरवठा केला जातो.या परिसरात निसर्ग सौंदर्य आणि वान नदीचे लहान-मोठे स्रोत खळखळून वाहत होते.
सदर सहलीसाठी अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी व सौ. आरती कुलकर्णी,किशोर महाजन व सौ.आरती महाजन,दीलिप भारंबे,सौ.कल्पना भारंबे, श्रीरंग कुलकर्णी व सौ.हर्षदाकुलकर्णी,सौ.माधुरी कोल्हे व अतुल कोल्हे,सौ.सुनीता महाजन व सोमनाथ महाजन या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.तसेच सौ.माधुरी चौधरी,रघुनाथ बऱ्हाटे व सौ.मिनाक्षी बऱ्हाटे,सौ. तेजल किनगे,श्रीमती सिंधु आरोटे यांनी सहभागी होऊन सहकार्य करत आनंद लुटला.अशाप्रकारे आमच्या ऑर्किड नेचर फाऊंडेशनची दोन दिवसीय सहल उत्साहात संपन्न झाली.
ऑर्किड नेचर फाऊंडेशनची दोन दिवसीय (गॉड ग्रीन ट्रीप)शेगाव,वन प्रकल्प सहल संपन्न
RELATED ARTICLES